ताज्याघडामोडी

अखेर अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलचा परवाना रद्द 

अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाची १४ तास अडवणूक पंढरपुरात ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने पंढरपुरातील एका ७५ वर्षीय कोरोना बाधित वृद्ध महिलेस सांगली येथील अपेक्स केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.पाच दिवस तेथे ऍडमिट असलेल्या वृद्धेस सोबत असलेल्या नातवास व सुनेस देखील भेटू दिले नाही.ती वृद्ध महिला ३० एप्रिल रोजी मरण पावली असता अडीच लाख रुपये भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात […]

ताज्याघडामोडी

बार मालकांना आणि हॉटेलचालकांना सवलत देण्याची शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई : राज्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि रुग्णासंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहार खिठप्प झाले आहेत. हॉटेल व्यावसायिक आणि बार चालकांनाही या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. याचीच दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्यावरून भाजपाचे […]

ताज्याघडामोडी

पंढपुरातील रुग्णाच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल करणारे ‘ते’ हॉस्पिटल बंद करा – आ.गोपीचंद पडळकर 

रुग्णास दाखल करून घेतले जाते,उपचारच केले जात नसल्याचा आ.पडळकर यांचा गंभीर आरोप पंढरपूर शहरातील एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेस कोरोनाची लागण झाली,२६ एप्रिल रोजी पंढपुरात ऑक्सिजन बेड न मिळाल्याने वृद्धेच्या नातवाने त्या रुग्णास सांगली येथील अपेक्स केअर हॉस्पिटल येथे दाखल केले.३० एप्रिल रोजी दुपारपर्यंत उपचार सुरु आहेत असेच उत्तर वृद्ध महिला रुग्णाच्या नातवास व सुनेस […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरणाबाबतची नियमावली बदलणार!

मुंबई – १ मेपासून महाराष्ट्रासह देशभरात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार काही राज्यांनी लसींच्या उपलब्धतेनुसार हे लसीकरण सुरू केले. काही मोजक्या केंद्रांवर महाराष्ट्रात देखील त्याची सुरुवात करण्यात आली. पण, लसींचा तुटवडा आणि त्यातून लसीकरण केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता, आता १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य सरकार […]

ताज्याघडामोडी

लॉकडाऊनमध्ये पालक घरात तर मुलं बाहेर; खेळता खेळता कारमध्ये श्वास गुदमरल्याने 4 चिमुरड्यांचा मृत्यू

लखनऊ, 7 मे :  उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये शुक्रवारी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चांदीनगर भागात सिगौली तगा गावात एका कारमध्ये श्नास गुदमरून 4 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून एकाची प्रकृती गंभीर आहे.या सर्व मुलांचे वय 4 ते 8 वर्षे इतकी होती. मृत झालेल्यांंमध्ये 4 वर्षांची वंदना, अक्षय, 7 वर्षांचा कृष्णा आणि 8 वर्षांच्या […]

ताज्याघडामोडी

मराठा आरक्षण : गरज पडल्यास एकदिवसीय अधिवेशन बोलावणार – अजित पवार

पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बुधवारी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ रद्दबातल ठरवला. मराठा समाजाला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्यामुळे हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात सर्वोच्च न्यायालयाचा […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी…! भारतात स्पुटनिक लाईट लसीच्या वापराला मंजुरी

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. भविष्यातील हानी टाळायची असेल तर जलद लसीकरण हा एकच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. या संदर्भात आता एक सकारात्मक बातमी आली आहे. भारतात स्पुटनिक लाईट लसीच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. वेगाने लसीकरण करण्यासाठी स्पुटनिक लाईट ही भारतासाठी संजीवनी ठरणार आहे. आता केंद्र सरकारनं या लसीला वापरासाठी मान्यता दिली […]

ताज्याघडामोडी

तुटवड्यादरम्यान कॅनॉलमध्ये आढळले हजारो Remdesivir इंजेक्शन

चंदीगढ 07 मे : देशात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. या परिस्थितीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली असून त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशात आता समोर आलेल्या एका घटनेनं सर्वांनाच विचारात पाडलं आहे. कारण, प्रचंड मागणी असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन कॅनॉलमध्ये आढळून आले आहेत. यात रेमडेसिवीर आणि चेस्ट इन्फेक्शनच्या इंजेक्शनचा समावेश आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गर्दी का केली? असा सवाल विचारणाऱ्या पोलिसांनाच मारहाण

सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, प्रशासन, पोलीस आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. लोकांच्या संरक्षणासाठी आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन व्हावे म्हणून पोलीस दिवस रात्र एक करून त्यांची ड्युटी निभावत आहे. मात्र काही ठिकाणी अशा घटना घडत आहे तिकडे […]

ताज्याघडामोडी

धक्कादायक! मृतदेहांची अदलाबदल, चूक लक्षात आल्यानंतर पुरलेला मृतदेह काढला बाहेर

लातूर, 07 मे: वैद्यकीय महाविद्यालयातील गलथान कारभार लातुरमध्ये समोर आला आहे. मृतदेहांची अदलाबदल झाल्यानंतर शेळगाव (ता.चाकूर) येथे अंत्यविधी करण्यात आलेला मृतदेह जमिनीतून उकरून काढण्यात आला आणि त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील धोंडीराम तोंडारे (वय 65) यांना मागील आठवड्यात कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर उदगीर येथे उपचार करून लातूर येथील […]