दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर ताशेऱे ओढले आहेत. परीक्षा रद्द करून सरकारने शिक्षणाची थट्टा चालवली आहे अशा शब्दात उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला. याबाबत तपशीलवार भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव […]
ताज्याघडामोडी
बँक ऑफ बडोदाच्या बँकिंग व्यवहारात 1 जूनपासून होणार मोठा बदल
नवी दिल्लीः आता ग्राहकांना चेकपेक्षा अधिक सोयीस्कर सुविधा सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेली बँक ऑफ बडोदा देणार आहे. तसेच ग्राहकांचे संभाव्य फसवणुकीपासून संरक्षणसुद्धा करणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये चेकद्वारे पैसे भरण्यासाठी ‘पॉझिटिव्ह वेतन प्रणाली’ अंतर्गत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरण्यापूर्वी पडताळणी करणे बंधनकारक आहे. 2 लाखांहून अधिक रकमेच्या चेकवर मोबाईल/नेट बँकिंग आणि शाखेतून पडताळणी करता […]
वाळू माफियांकडून आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण
यवतमाळ जिल्ह्यात राजकीय, प्रशासकीय यंत्रणेच्या पाठबळामुळे रेती माफियांचा हैदोस वाढल्याचे दिसत आहे. यामुळेच बुधवारी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचे (आरटीआय) सिनेस्टाईल अपहरण करून त्याला ओलीस ठेवत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढच नाही तर समाजात आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये दहशत पसरावी म्हणून या कार्यकर्त्यास विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर देखील व्हायरल […]
ग्रामीण भागात टेस्टींग व ट्रेसिंगची संख्या वाढवा
पंढरपूर दि. 21 : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत टेस्टींग कराव्यात तसेच बाधित व्यक्तींच्या संपर्कातील जास्तीत-जास्त व्यक्तींचा शोध घेवून संस्थात्मक अलगीकरण करुन तात्काळ उपचार करावेत अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिल्या. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी करण्यात उपाययोजनेबाबत शासकीय […]
आरोग्य भरती पारदर्शी पद्धतीने करा – भाजयुमो
आरोग्य भरती पारदर्शी पद्धतीने करा – भाजयुमो भारतीय जनता युवा मोर्चा मंगळवेढा च्या वतीने आज राज्य सरकारने घोषित केलेली आरोग्य भरती पारदर्शी पद्धतीने करावी व मार्च 2021 ला झालेल्या परिक्षेबाबत भूमिका स्पष्ट करावी असे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले . या निवेदनामद्ये , सध्या राज्य सरकारचा कोणत्याच गोष्टींमध्ये भूमिका ठाम नाही . […]
कोव्हिशील्डचा पहिला डोस कोवॅक्सीनपेक्षा अधिक प्रभावी- ICMR
देशात कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. देशात सध्या कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सीन लसींचे डोस नागरिकांना दिले जात आहेत. परंतु अनेक राज्यांमध्ये लसींचे डोस कमी पडत असल्याने लसीकरण अभियान थंडावले आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसींच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवड्यांपर्यंत करण्यात आले आहे. यावर आता भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थाचे […]
जिल्हा परिषदेचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात
सांगली | जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक अरुण योगिनाथ कुशिरे हा २५ हजार रुपयांची लाच घेताना सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेतच त्याला पैसे घेताना रंगेहात पकडले. ऐन कोरोनाच्या धामधुमीत कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. जिल्हा परिषदेच्या एका ठेकेदाराने केलेल्या कामांची बिले मिळण्यासाठी बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. कामासाठी […]
राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,…
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर केला आहे. तर राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक शहरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत आहे. मात्र तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. राज्यातील ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. यातच, १ जूनपर्यंत नंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. […]
गुन्हेगाराला फेसबुक पोस्ट पडली महागात; ‘भाई का बड्डे’ थेट पोलीस कोठडीत
पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुरापती करण्याचा मानस असल्याचा आशय असलेली पोस्ट एका सराईत गुन्हेगाराने फेसबुकवर टाकली. त्यावर त्याच्या एका चेल्याने त्याच आवेशात कमेंट देखील केली. मात्र या दोघांना आणि कथित भाईचे फेसबुक हँडल करणाऱ्या एकाला ही पोस्ट चांगलीच महागात पडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली. त्यामुळे पोस्ट टाकणाऱ्या भाईचा वाढदिवस चक्क पोलीस कोठडीत गेला. […]











