….अन्यथा अधिकाऱ्यांना डांबून ठेऊ – अतुल खूपसे – पाटिल शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या जिल्हा परिषदला धडा शिकवू प्रतिनिधी शेलगाव ते वांगी – ०२ या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वांगी – ०२ जवळील अनेक गावांच्या समोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी तसेच लघु उद्योजकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची अत्यंत […]
ताज्याघडामोडी
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पंढरपूर तालुक्यातील रस्त्यांच्या ३ कामांना मंजुरी
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पंढरपूर तालुक्यातील करकंब भोसे ते व्होळे या ११ किमी लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्ती व देखभाली साठी ५ कोटी ९१ लाख तर करकंब ते घोटी या रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ३३ लाख आणि ओझेवाडी ते शंकरगाव या साडेचार किमी रस्त्यासाठी ३ कोटी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून या कामांसाठी […]
पुन्हा कडक लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या चर्चेने पंढरपूरकर धास्तावले
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असतानाच व मुंबई सारख्या महानगरात रात्री १० वाजेपर्यत सर्वच व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असतानाच,पुणे शहरात व्यापारी वर्ग प्रशासनाचे आदेश झुगारून रात्री ७ पर्यत दुकाने उघडी ठेवण्यावर ठाम रहात आंदोलन करीत असतानाच पंढरपूर शहरातील दुकानदार छोटे मोठे व्यवसायिक मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन आणि संचार बंदीच्या चर्चेने मात्र धास्तावले असल्याचे […]
मुख्याध्यापकास शिक्षकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण
शिक्षण सेतू अभियानाचे काम सांगितल्याचा राग आल्याने विसापूर शासकीय आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षक अनिल देसले यांनी मुख्याध्यापक रवींद्र मानकर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी देसले यांच्या कामकाजाची चौकशी केली. त्यात प्रथमदर्शनी देसले दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कळवण तालुक्यातील विसापूर […]
माहिती अधिकाराचा अर्ज करून १० लाखाच्या खंडणीची मागणी
पंढरपुरातील बोगस बांधकाम कामगार नोंदणीची यलगुंडे चौकशी करणार ? सोलापूरचे जिल्हयाचे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून काम करणारे निलेश यलगुंडे हे पदभार स्वीकारल्यापासून सातत्याने टीकेचे धनी ठरले आहेत.कोरोनाच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील खाजगी कामगार व नोंदणीकृत बांधकाम कामगार याना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्याबाबत सह.कामगार आयुक्त कार्यालय हे उदासीन भूमिका निभावत आहे व सह.कामगार आयुक्त म्हणून कार्यरत […]
मोलकरणीने चक्क तिजोरीच पळवली; ज्येष्ठ दाम्पत्याच्या घरी 25 लाखाची चोरी
घरकाम करणाऱ्या महिलेने तीसऱ्याच दिवशी सोन्याचे दागिणे, रोकड, विदेशी चलन असलेली 23 लाख 53 हजाराची डिजीटल तिजोरी घेऊन पळ काढला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 ते 30 जुलै या कालावधीत बोराडेनगर वानवडी परिसरातील एका सोसायटीत घडली आहे. मोलकरणीला डिजिटल तिजोरी उघडता न आल्याने तीने तिजोरीच घेऊन पळ काढला […]
कर्मयोगी विद्यानिकेतन सेमी इंग्लिश स्कुल पंढरपूर येथे “इन्व्हेस्टीचर सेरेमनी” उत्साहात साजरी
कर्मयोगी विद्यानिकेतन सेमी इंग्लिश स्कुल पंढरपूर येथे “इन्व्हेस्टीचर सेरेमनी” उत्साहात साजरी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये शुक्रवार दि.०६.०८.२०२१ रोजी “इन्व्हेस्टीचर सेरेमनी” उत्साहात साजरी करण्यात आली. गेली ४ वर्षे कर्मयोगी विद्यानिकेतन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्याकरीता निरंतर कार्यरत आहे याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. सध्याच्या या कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत […]
पंढरपूर परिसरातील गुंठामंत्री शासनाच्या आदेशामुळे टेन्शनमध्ये,ले आउट शिवाय गुंठेवारी दस्त नोंदणीची चौकशी होणार ?
२० गुंठे किंवा त्या पेक्षा कमी शेती क्षेत्र असेल तर अशा क्षेत्रातील जागेची गुंठेवारी पद्धतीने विक्री करण्यास राज्य शासनाने काही वर्षांपूवी मनाई केली होती.आता या बाबत शासनाने पुन्हा दिलेल्या निर्देशानुसार नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र यांनी गत महिन्यात गुंठेवारी व २ एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतजमिनीच्या खरेदी विक्री चा दस्त नोंदविण्याबाबत पुन्हा नव्याने […]
क्ररतेचा कळस ; दारू पिण्यापासून अडवले
जालनाः जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी येथे पोटच्या मुलानं जन्मदात्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. तर, सातऱ्यातही किरकोळ कारणावरुन स्वतःच्याच आईचा खून केल्याची घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसै शिल्लक नसल्यानं घरातील गहू, तांदूळ विकायचे आणि दारू प्यायची यासाठी सखाराम शिंदे हा तरूण सकाळी गहू तांदूळ घेऊन निघाला होता. तेवढ्यातच आईने गहू- तांदूळ नेऊ नकोस […]
महाराष्ट्रातील सर्व शाळा लवकरच सुरु होणार
कोरोना महामारीच्या संकटामुळे जवळपास गेल्या दीड वर्षापासून सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा केव्हा सुरु होणार, हा प्रश्न पालकांना पडला आहे. अशातच आता लवकरच महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारांना कोरोनामुळे शाळांना लागलेली कुलूपे खोलण्याचा अधिकार आहे. […]











