ताज्याघडामोडी

बायको रुसल्याने फोन उचलत नाही, पोलिसाचा सुट्टीसाठी अर्ज

बायकोचा राग हा भल्या भल्या नवऱ्यांना धडकी भरवतो. कारण, बायको रुसली तर तिची समजूत काढेपर्यंत नवऱ्यांच्या नाकी नऊ येऊ शकतात. अशाच एका रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी पोलिसाने सुट्टीचा अर्ज केला आहे. घटना नेपाळ सीमेलगत असलेल्या उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलीस शिपायाने सुट्टीचा अर्ज देताना जे कारण दिलं आहे, त्यामुळे त्याचा अर्ज सोशल […]

ताज्याघडामोडी

चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलीची हत्या

औरंगाबाद शहर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. चारित्र्याच्या संशयावरून एकाने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली आहे.घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. समीर विष्णु म्हस्के असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून, पत्नीचे आरती समीर मस्के तर मुलीचे निशात समीर मस्के नाव आहे. पोलिसांकडून […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील अनेक रस्ते होणार चकाचक

निधी मंजूर करण्यासाठी आ.समाधान आवताडेंचा यशस्वी पाठपुरावा  पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील रस्ते मजबूतीकरण करणे आणि त्यात सुधारणा करणे यासाठी ३०५४ योजनेअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या विशेष सहकार्याने २कोटी ९१ लाख तसेच ५०५४ योजनेअंतर्गत ७६ लाख असे एकुणात्मक ३ कोटी […]

ताज्याघडामोडी

थंडीमुळे पत्नीचा मृत्यू; भीक मागून गरीब शेतकऱ्याने केले अंत्यसंस्कार

आपल्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठीही पैसे नसणे ही, एखाद्यासाठी किती दुर्दैवाची गोष्ट असू शकते, याचा विचार तुम्ही करू शकतात. मात्र, अशीच एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये थंडीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेचा कथित थंडीमुळे मृत्यू झाल्यानंतर तिच्या पतीने भीक मागून तिचा अंत्यसंस्कार केला. पतीने आपल्या पत्नीचा मृत्यू […]

ताज्याघडामोडी

शाळेत जाताना आधी छेड काढली, मग अल्पवयीन मुलीला बळजबरीने लावला कुंकू

शाळेमध्ये जाताना आधी अल्पवयीन मुलीची छेड काढली. त्यानंतर घरात कोणी नसल्याचे पाहून बळजबरीने अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घातली. आणि तिच्या भांगेत बळजबरीने कुंकू लावत तिची छेडछाड काढण्यात आली. ही घटना परभणीच्या पालम तालुक्यातील रामापूर येथे घडली. या प्रकरणी एका आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पालम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

ताज्याघडामोडी

मग काम कुठं मागायचं? ‘त्या’ विधानावर राज ठाकरे यांना अजित पवार यांचा सवाल

राज्याबाहेर एकामागून एक जाणाऱ्या उद्योगांवरुन शिंदे – फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यातील प्रस्तावित उद्योग गेल्या वर्षात सलग शेजारच्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात गेले आहेत. यावरुन मोठं राजकारणी रंगलं होतं. ‘वेदांत-फॉक्सकॉन’ सारखे पाच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले होते. याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी एक […]

ताज्याघडामोडी

कपाटात साचते पाणी अन् ! आपोआप सरकतात घरातील वस्तू, घटनेने खळबळ

एखाद्या हॉरर चित्रपटात चमत्कारिक प्रकार घडावा असार प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील उमरी येथील एका घरात दिवसाढवळ्या अविश्वसनीय घटना घडली आहे. धान्याच्या डब्यांसह कपडे भरलेल्या कपाटामध्ये पाणी साचते तर वस्तू आपोआप सरकत असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत भंडारा जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. उमरी येथे सुमेध मेंढे कुटुंबासह राहतात. सुमेध, […]

ताज्याघडामोडी

गोपीचंद पडळकरांना धक्का; भाऊ ब्रम्हानंद पडळकरांसह १०० जणांवर गुन्हा दाखल

सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील काही दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने मध्यरात्री पाडण्यात आले. यामुळे येथे दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी हे अतिक्रमण बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने पाडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रकरणी पोलिसांनी आता मोठी करवाई केली असून आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद […]

ताज्याघडामोडी

बदलेची आग भडकली! जुन्या वाद डोक्यात ठेवून मित्रावरच वार, कॉलेजला जाताना केला घात

वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरामधील विद्याभारती महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर त्यांच्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्याने जुन्या वादातून चाकूने वार करून एकाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक विध्यार्थी गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हल्ला करणारा विद्यार्थी निखिल मेहरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात. भा.द.वी. कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६, ३४ […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरात मटका एजंटसह बुकी मालकावर गुन्हा दाखल

३७० रुपये रोख रक्कम जप्त मागील काही महिन्यापासून पंढरपुरात जगोजागी मटका एजन्ट बिनधास्तपणे खुलेआम मटका जुगाराच्या नावाखाली आकडे घेताना दिसून येत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.अधून मधून अशा मटका एजटांवर पोलीस कारवाई होतानाही दिसून येते.मटका जुगाराच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करताना रंगेहात पकडून गुन्हे दाखल झाल्याचे प्रकार अधून मधून घडत असतात.गुन्हे दाखल झालेले बहुतांश मटका एजन्ट […]