ताज्याघडामोडी

सरकारचा मोठा निर्णय ! आता शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही मिळणार दुसऱ्या शाळेत प्रवेश

मुंबई – शाळेतील विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असल्यास आता शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) नसेल तरी प्रवेश मिळणार आहे. तसेच शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास विद्यार्थ्यांच्या जन्म प्रमाणपत्रवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शासन निर्णयात म्हटले आहे की, प्रत्येक मुलाला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षकाला कुटुंबासहित जाळून टाकण्याची धमकी; संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल

बीड, 17 जून : मुजोर संस्था चालकाकडून शिक्षकाच्या कुटुंबाला जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत उघडकीस आला आहे. सतीश बळीराम जाधव अस पीडित शिक्षकांचे नाव आहे. यात शिक्षक आणि संस्था चालक यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून यात अर्वाच्य भाषेत आई-बहिणीवर शिवीगाळ केली आहे. तसेच तुझे 10 लाख रुपये […]

ताज्याघडामोडी

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि ठाण्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच पावसाचा जोर पाहिला मिळतोय. राज्यात सर्वदूर पाऊस राज्यात सर्वदूर मान्सूनची बरसात होतेय. विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. […]

ताज्याघडामोडी

पंढरीत भव्य चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम

पंढरीत भव्य चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम पंढरपूर (प्रतिनिधी):- भावी पिढीच्या बुध्दीला चालना देण्यासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवार, पंढरपूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन पंढरपूर शहरामधील विद्यार्थ्यांसाठी भव्य अशा ऑनलाईन चित्रकला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा, दाम्पत्याला बांधून 66 लाखांची लूट

पुणे : लोणवळ्यात वरिष्ठ डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीचे हात-पाय बांधून सहा दरोडेखोरांनी चोरी केली. 66 लाखांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाल्याचा दावा खंडेलवाल दाम्पत्याने केला आहे. दरोडेखोर दोरखंडाने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIA चा छापा

मुंबई- एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयए कडून छापेमारी करण्यात आली आहे. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीमधील घरावर सकाळी सहा वाजता हा छापा टाकण्यात आला आहे. प्रदिप शर्मा आणि सचिन वाझे हे मित्र आहेत. शर्मा यांच्याबाबत काही लिंक मिळाल्या असल्याची माहिती एनआयए मिळाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली होती. त्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणी […]

ताज्याघडामोडी

“.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”; खासदार उदयनराजेंचा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी काल मुक आंदोलन पार पडल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक यांची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे. दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सहा मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दारूच्या नशेत पाणी पुरवठा योजनेच्या विहीरीत टीसीएलची पिशवी ओतल्याने 50 जणांना बाधा

जावळी तालुक्यातील सरताळे गावातील ग्रामसेवकांचा भोंगळ कारभारामुळे लोकांना दूषित पाणी पिल्याने बाधा झालेली आहे. ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारूच्या नशेत नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत टी. सी. एलची भरलेली संपूर्ण पिशवी टाकल्याचा प्रकार केला आहे. या दूषित पाण्यामुळे अनेकांना त्रास होवू लागला आहे. उपचार घेत असलेल्या काहींची प्रकृती गंभीर तर काही किरकोळ उपचार घेऊन सुखरूप असल्याची माहिती मिळत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

जागेचा उतारा देण्यासाठी आणि सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वेल्हा तालुक्यातील कोदवडी गावच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मुकुंद त्रिंबकराव चिरटे (वय 34. रा. नसरापूर ता. भोर, तलाठी कोदवडी वेल्हा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या संस्थेनी 20 गुंठे जागा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राम मंदिरावरील टीकेवरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

मुंबई – मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनसमोर जबरदस्त हाणामारी झाली आहे. शिवसेनेकडून राम मंदिरावरुन करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान परिसरातील वाहतूक हाणामारीमुळे विस्कळीत झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी केलेल्या […]