राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी प्रवासी बस, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र खासगी वाहतूक करणारे अव्वाच्या सव्वा दर आकारत असून प्रवाशांची अक्षरशः लूट केली जात आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त […]
ताज्याघडामोडी
चोरांचा पाठलाग करताना हृदयविकाराचा झटक्याने पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
लातूरमध्ये रात्रीच्या गस्तीदरम्यान घरफोडी करीत असलेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना स्थानिक गुन्हे शाखेचे लातूर येथे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमदखान पठाण यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. चोरट्यांचा पाठलाग करताना पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी कॉलनी परिसरात एका घरात चोर शिरले. दार तोडल्याचा आवाज ऐकून शेजार्यांनी […]
राज्य शासनाचा जीआर अमान्य, एसटी कर्मचारी संपावर ठाम; संप अधिक चिघळण्याची शक्यता
राज्य शासनाच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने एक समिती गठीत करण्याचा जीआर काढला आहे. मात्र, हा जीआर अमान्य असल्याचं सांगत एसटी कर्मचाऱ्यांनी आपण संपावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. संपाच्या 11 व्या दिवशीही तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यासाठी गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर […]
अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीची हत्या, स्वतःचाही कापला गळा
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करून पतीने स्वतःचा गळा कापून घेतल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने याच विषयावरून झालेल्या वादानंतर तिची हत्या केली. पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. असा वाढला संशय बिहारच्या जमुई भागात राहणाऱ्या छोटेलाल सोरेन यांचं संगीता […]
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पडळकर यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू नानासो जानकर (वय 29, रा. भेंडवडे, ता. खानापूर) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जानकर यांच्या फिर्यादीनुसार आमदार पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी […]
महाराष्ट्र सरकारही पेट्रोल डिझेल चे दर कमी करण्याच्या तयारीत?
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार, याचे चित्र स्पष्ट होईल. इंधन […]
गोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घातली; शिवसेना कार्यकर्त्याचा आरोप
जिल्हा बँकेच्या मतदानासाठी ठराव करण्याच्या वादातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी सायंकाळी जोरदार राडा झाला. आमदार पडळकर यांनी गाडी अंगावर घातल्याचा आरोप शिवसेनेचे कार्यकर्ते राजू जानकर यांनी केला आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. या घटनेनं आटपाडीत प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त […]
महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये टोळी युद्ध सुरू- राजू शेट्टी
महाराष्ट्रात गुंडाप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये टोळीयुद्ध सुरू असून जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दोन्ही सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. तसेच दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलणे गरजेचे असताना ते भलत्याच कामात व्यस्त असल्याचे ठिकाण देखील यावेळी शेट्टी यांनी केली. सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या […]
एकाच घरामध्ये पुरुषासह महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ
पुण्यातील मुंढवा परिसरातील केशवनगर येथील कुंभारवाडा येथे एका घरामध्ये एका पुरूषासह महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला असून मुंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. शरद भुजबळ (47) आणि हेमा (43 – ही नेपाळी महिला आहे) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. शरद भुजबळ […]
आ.गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह ताफ्यातील गाड्यांची तोडफोड
सांगलीच्या आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गट आमने-सामने आले आहेत. यावेळी पडळकर यांची गाडी फोडली आहे. तर त्यांच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या आहेत. काहीजण जखमी झाले आहेत. आटपाडी मधील साठे चौकात ही घटना घडली आहे. दोन्ही गटात चांगलाच वाद झाला असून पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले आहेत.सांगली येथे जिल्हा मध्यवर्ती […]










