ताज्याघडामोडी

चोरांचा पाठलाग करताना हृदयविकाराचा झटक्याने पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

लातूरमध्ये रात्रीच्या गस्तीदरम्यान घरफोडी करीत असलेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना स्थानिक गुन्हे शाखेचे लातूर येथे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमदखान पठाण यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

चोरट्यांचा पाठलाग करताना पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी कॉलनी परिसरात एका घरात चोर शिरले. दार तोडल्याचा आवाज ऐकून शेजार्‍यांनी पोलिसांना फोन केला. घटनास्थळी लगेच एलसीबीची गाडी पोहचली. तिघे चोरटे होते ते मागच्या बाजूने पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग केला.

अहमद खान पठाण (वय 56) पाठलाग करताना खाली कोसळले. त्यांना तत्काळ त्यांना शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी आणि रूग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे अहमदखान पठाण यांचे पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच अहमदखान पठाण यांना शोक सलामी देण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, राखीव पोलीस निरीक्षक गफार शेख व पोलीस अमलदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *