ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. […]
ताज्याघडामोडी
स्वेरी इंजिनिअरिंगमध्ये ऑनलाइन ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाकडून मागील पाच दिवसापासून सुरु असलेल्या ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’चा समारोप करण्यात आला. यामध्ये संशोधक व प्राध्यापकांनी ‘व्हीअरेबल डीवायसेस अँड इट्स टेक्नोलॉजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘व्हीअरेबल डीवायसेस अँड इट्स टेक्नोलॉजी’ हे तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही अटल (एआयसीटीई, ट्रेनींग अँड […]
सुजय विखे पाटील-रोहित पवार यांची छुपी युती
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बँकेची येत्या 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक आहे. मात्र त्यापूर्वीच जिल्हा बॅंकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय कुरघोड्यांना उधाण आले आहे. जामखेड विविध सेवा मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड होणार आहे. राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्या छुप्या युतीमुळे जगन्नाथ राळेभात यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु […]
लग्नाच्या भूलथापा, उच्चशिक्षित तरुणीला १६ लाखांचा गंडा
कल्याण: विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळखीनंतर डॉक्टर असल्याचे सांगून लग्नाच्या भूलथापा देऊन उच्चशिक्षित तरुणीला १६ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीने विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. ही तरुणी खडकपाडा येथे राहते. नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत ती मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. विवाह नोंदणी केल्यानंतर तरुणीशी […]
सोशल मीडियावर ओळख, निवृत्त शिक्षिकेची १३ लाखांची फसवणूक
पुणे: फेसबुकवर ओळख झालेल्या व्यक्तीने एका निवृत्त शिक्षिकेची १३ लाख १७ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६१ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात फसवणूक व आयटी अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी ते जून २०२० दरम्यान […]
सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावरील किर्तन सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता
चंद्रभागानगर (दि.०९)ः- सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे यांच्या १९ व्या पुण्यतिथी निमित्त सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखाना कार्यस्थळावर कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेमार्फ़त आयोजित करण्यात आलेल्या किर्तन सोहळ्याची सांगता मळोली (ता.माळशिरस) येथील गुरुवर्य ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर यंाच्या काल्याच्या किर्तनाने झाली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळे, व्हा.चेअरमन मा.श्री.राजेंद्र शिंदे उपस्थित होते. प्रारंभी संस्थापक चेअरमन […]
दहा दिवसात दहा हजार नोंदीचे निर्गतीकरण करणार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते होणार आज सातबारा वितरण
सोलापूर,दि.9: दहा दिवसांत दहा हजार फेरफार नोंदीचे निर्गतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फेरफार नोंदीच्या कामांचा जलदगतीने निपटारा करावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याद्वारे विशेष अभियान राबविण्यात येऊन एक फेब्रुवारी पासून दिवसांत सुमारे सहा हजार फेरफार नोंदी निकालात काढण्यात […]
लोणीकंद येथे तरुणावर भरदिवसा गोळीबार
वाघोली (पुणे)- लोणीकंद (ता. हवेली) येथे मंगळवारी (दि. 9) दुपारी बाराच्या सुमारास एका युवकावर भर दिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत सचिन शिंदे हा तरुण जखमी झाला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.या […]
नांदेडमध्ये खलिस्तानी दहशतवाद्याला अटक, हिंदू संघटनेचे नेते होते रडारवर
नांदेड, 09 फेब्रुवारी : खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा सदस्य असलेला सरबजीतसिंघ किरट याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने रविवारी उशिरा अटक केली.सरबजीतसिंघ किरट हा खलिस्तान जिंदाबाद या प्रतिबंधीत दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. बेल्जियमशी संबंधित खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेशी तो संपर्कात होता. बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी […]
सुस्ते येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते नजीकच्या स्मशानभूमी जवळीत नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत पिकअप वाहनासह अर्धा ब्रास वाळू ताब्यात घेण्यात आली असून या प्रकरणी शाम दत्तात्रय लोखंडे वय 27 वर्षे रा. सुस्ते ता. पंढरपुर याच्या विरोधात भा.दं.वि.कलम379सह गौण खनिज कायदा1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]











