गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लोणीकंद येथे तरुणावर भरदिवसा गोळीबार

वाघोली (पुणे)- लोणीकंद (ता. हवेली) येथे मंगळवारी (दि. 9) दुपारी बाराच्या सुमारास एका युवकावर भर दिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत सचिन शिंदे हा तरुण जखमी झाला आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या हल्ल्यामागील नेमके कारण अजून समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *