

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते नजीकच्या स्मशानभूमी जवळीत नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत पिकअप वाहनासह अर्धा ब्रास वाळू ताब्यात घेण्यात आली असून या प्रकरणी शाम दत्तात्रय लोखंडे वय 27 वर्षे रा. सुस्ते ता. पंढरपुर याच्या विरोधात भा.दं.वि.कलम379सह गौण खनिज कायदा1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत दाखल फिर्यादीनुसार सुस्ते येथून अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच रात्री दहाच्या सुमारास तालुका पोलीस ठाणाचे कर्मचारी हे त्या ठिकाणी गेले असता शंभूराजे मर्डर्न हायस्कूल ( बंद) जवळील रस्त्यावरून एक पिकअप वाहन येताना दिसले.सदर पिकअप चालकास वाळु वाहतुक परवाना बाबत विचारणा केली असता त्याकडे कुठलाही वैध परवाना नसल्याचे दिसून आले.या प्रकरणी कारवाई करीत पाढ-या रंगाचा पिकअप आरटीओ नंबर MH 45 AF4572 वाळूसह ताब्यात घेण्यात आले.