गणेश कपूर नावाचे बनावट खाते वापरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टवर अवमानकारक टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली एका महिलेला मंगळवारी अटक करण्यात आली. पल्लवी सप्रे यांनी तक्रार केल्यानंतर ठाण्यातून महिलेला अटक करण्यात आली, त्यांनी 7 सप्टेंबर रोजी “अपमानकारक” टिप्पण्या वाचल्या होत्या. त्यानंतर महिलेवर बदनामी आणि तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. […]
ताज्याघडामोडी
स्वेरीच्या दोन विद्यार्थीनींची ‘जेड ग्लोबल’ कंपनीत निवड
‘जेड ग्लोबल’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थीनींची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. पुणे येथील ‘जेड ग्लोबल’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून […]
जेवणाच्या ताटावरून उठलेल्या डॉक्टरला कुटुंबीयांसह मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा
बारामती पेशंटला तपासणीसाठी घरातून लवकर बाहेर न आल्यावरून डॉक्टर सह कुटुंबीयांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील सांगवी येथे घडली. याप्रकरणी युवराज शिवाजी गायकवाड, डॉक्टर रा. सांगवी, ता बारामती यांनी फिर्याद दिली आहे. आनंदा संभाजी जगताप, विश्वजीत आनंदा जगताप, भूषण आनंदा जगताप, राजेंद्र शंकर जगताप, अशोक शंकर जगताप, सर्व राहणार सांगवी ता. बारामती […]
खास डिझाईन केलेल्या बेल्टमध्ये सापडली तब्बल 12 किलो सोन्याची बिस्कीटे, कस्टम विभागाची मोठी कारवाई
आजकाल काही लोक सहज पैसे मिळवण्यासाठी सोन्याच्या तस्करीसारखे, अवैध काम करत आहेत. मात्र, काही वेळा हे गुन्हेगार पोलिसांच्या हाती सहज लागतात. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने कारवाई करुन, तब्बल 12 किलो सोन्याची बिस्कीटे जप्त केली आहे. खास तयार केलेल्या पट्ट्यातून १२ किलो सोन्याची तस्करी करणाऱ्या सुदानी नागरिकाला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या […]
धक्कादायक घटना; बापाकडूनच तरुण मुलीचे लैंगिक शोषण
राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्यातही बलात्कार, लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. आता बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. सख्ख्या बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – ही संतापजनक घटना पुण्यातील […]
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्याच नावावर.” अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अजित पवारांचं वक्तव्य
आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं आहे. या अधिवेशनाला देशभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारदेखील या अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या नावावर चालतो, असं त्यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ […]
दुर्दैवी घटना…घरात झोपलेल्या दोन चिमुकल्या भावंडाचा सर्पदंशाने मृत्यू
घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली.या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली आहे. सुशील बलवीर डोंगरे (वय ८) व उत्कर्ष बलवीर डोंगरे (वय ११) असे मृत भावंडाचे नाव आहे. दोन्ही भाऊ रात्री एकाच बिछान्यावर झोपले होते. रात्री मागच्या दारातून […]
आमदार प्रशांत बंब यावेळी शिक्षकांवर नाही तर या लोकांवर भडकले
भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष चांगलाच पेटला आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षकांनी मोर्चा काढला. औरंगाबादच्या हमखास मैदानावरती शिक्षकांचा हा मोर्चा निघाला. हजारो शिक्षक प्रशांत बंब यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले. काही शिक्षक आमदारांनी शिक्षकांच्या या आंदोलनाला सपोर्ट केला आहे. या आंदोलनानंतर प्रशांत बंब यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. मला काय आमदारकी चाटायची […]
राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर शरद पवारांसमोरच ड्रामा, अजित पवार थेट कार्यक्रमातूनच बाहेर पडले
राष्ट्रवादीचं 8 वे राष्ट्रीय अधिवेशन राजधानी दिल्ली इथं पार पडलं. पण हे अधिवेशन अजित पवार यांच्या नाराजीनाट्यामुळे गाजलं. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात सर्व बड्या नेत्यांनी भाषण केलं. मात्र, अजित पवार यांनी भाषण केलं नाही. अजित पवार यांनी भाषण न केल्याने आता वेगळी चर्चा सुरू आली आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा दिसून आलं. […]
अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत वकिलाचा महिलेवर बलात्कार
एका वकिलाने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित तयार केली. तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार देऊन विश्वासघात केला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी वकिलावर गुन्हा नोंदविला आहे. रियाज ताज मोहम्मद शेख (४३) रा. गणेशपेठ असे आरोपीचे नाव आहे. रियाज शेख हा स्वत:ला वकील असल्याचे सांगतो. […]











