ताज्याघडामोडी

शिंदे सरकारकडून तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश

आरोग्य मंत्री तानाजी सावंत मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर  नाराज असल्याची होती चर्चा राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत.  कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईचा कार्यभार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या […]

ताज्याघडामोडी

विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार; लाथ मारून केला गर्भपात

औरंगाबाद शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) युवक शहराध्यक्षाने एका विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केला. लग्नाचे तसेच घर देण्याचे अमिष दाखवून त्याने पीडित महिलेचं वारंवार लैगिंक शोषण केलं. यातून पीडिता गरोदर राहिली. तिने लग्नासाठी तगादा लावला असता, आरोपीने तिच्या पोटात लाथ मारून तिचा गर्भपात केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल […]

ताज्याघडामोडी

महात्मा फुले,सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रा.मारुती गायकवाड यांना प्रदान

पेहे ता.पंढरपूर येथील कृतिशील शिक्षकाचा गौरव  खरा शिक्षक दिन हा 05 सप्टेंबर नसून शिक्षणासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली अशा महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन हा खरा शिक्षक दिन आहे, अशी मांडणी काही पुरोगामी संघटनांकडून सातत्याने होत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट्र सेवा समूह, व […]

ताज्याघडामोडी

1 डिसेंबरला पंढरपुरात आदर्श माता व कर्तृत्ववान महिलांचा शारदाई पुरस्काराने होणार गौरव

अजितदादा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा उपक्रम पंढरपूर – अजितदादा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पंढरपूर यांच्यावतीने देशाचे नेते पद्मविभुषण मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक आदर्श माता व कर्तृत्ववान महिलांचा मातोश्री शारदाई पुरस्कार देवून दि.1 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता के.बी.पी. महाविद्यालय पंढरपूर येथील बॅरिस्टर पी.जी.पाटील सभागृहात सन्मान करण्यात […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये ‘संविधान दिन’ साजरा

भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून यामुळे भारतातील लोकशाही व मानवी अधिकार अबाधित आहेत. संविधानाने आपल्याला अनेक अधिकार आणि हक्क दिले असून संविधानामध्ये नमूद केलेल्या मूल्यांचा व तत्वांचा आदर करून त्याचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी शेळवे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी […]

ताज्याघडामोडी

२४ दिवसात आवताडे शुगरचे एक लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप

 शेतकऱ्यांना समाधानकारक दर देणार -चेअरमन संजय आवताडे  मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर्स अँण्ड डडिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने ४ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोळी पूजन करून प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ केला होता तेव्हापासून २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता एक लाख मेट्रिक टन उसाचे […]

ताज्याघडामोडी

तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत मातोश्री सरूबाई माने विद्यालय प्रथम

तालुकास्तरीय आंतरशालेय १७ वर्ष वयोगटातील संघाची बाजी  पंढरपूर तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा लोटस पब्लिक स्कूल कासेगाव या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्या. सदर स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेमध्ये पंढरपूर तालुक्यातील शालेय क्रिडा स्पर्धांत कायमच उल्लेखनीय प्रदर्शन करणार्या मातोश्री सौ.सरुबाई माने विद्यालय व कला शास्त्र कनिष्ठ महाविद्यालय भटुंबरे तसेच मातोश्री […]

ताज्याघडामोडी

थकीत वीज देयकावरुन महावितरणच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की

थकीत वीज देयक वसुलीसाठी गेलेल्या महाविरणमधील अधिकारी; तसेच कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना खडकी भागात घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.अबू सईद मोहम्मद कुरेशी (वय ४२, रा. जुना बाजार, खडकी) याच्यासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महावितरणमधील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी विवेक काळे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. […]

ताज्याघडामोडी

स्‍टेटसवर स्वतःलाच श्रध्दांजली‌ वाहिली, नंतर घराबाहेर जाऊन तरुणाने संपवले जीवन

हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील कारेगाव शिवारात स्वतःच भावपूर्ण श्रध्दांजलीचे स्टेटस ठेऊन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी ता. २७ उडकीस आला आहे. वडिलांच्या नावे असलेले ७० हजाराचे कर्ज कसे फेडावे या चिंतेमुळे त्याने हे पाऊल उचलले आहे. नवल जयराम नायकवाल (२८) असे तरुणाचे नाव असून याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. […]

ताज्याघडामोडी

60 फूट उंचीवरुन रेल्वे रुळावर 20 जण पडले, 8 जण गंभीर

चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पुलावरील स्लॅब कोसळल्याची दुर्देवी घटना समोर आलीय. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. त्यापैकी आठ जणांची प्रकृीत गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरहेड वायरचा स्पर्श झाल्याने काही प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच प्रवासी हे 60 […]