ताज्याघडामोडी

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये ‘संविधान दिन’ साजरा

भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून यामुळे भारतातील लोकशाही व मानवी अधिकार अबाधित आहेत. संविधानाने आपल्याला अनेक अधिकार आणि हक्क दिले असून संविधानामध्ये नमूद केलेल्या मूल्यांचा व तत्वांचा आदर करून त्याचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी शेळवे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले. भारतीय संविधान दिनानिम्मीत महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थी व उपस्थितांना संबोधित केले. 
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशीकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.  सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. गोविंदराज पांपटवार यांनी संविधान सप्ताहाच्या निमीत्ताने महाविद्यालायमध्ये निबंध, वक्तृत्व, पोस्टर प्रेझेंटेशन अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.
या संविधान दिनाच्या कार्यक्रमास श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व विभागाचे प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *