ताज्याघडामोडी

अमेयने ढकललं नाही, मीच घसरुन पडले असेन; ‘जीव घेण्याच्या प्रयत्न’ प्रकरणी प्रियांगीचा दावा

२५ वर्षीय मैत्रिणीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अमेय दरेकर याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून पोलिसांनी अमेयची आई राधिका दरेकर यांचे नाव वगळले आहे. मालाडमधील बीपीओची कर्मचारी असलेल्या प्रियांगी सिंगला १२ नोव्हेंबर रोजी अमेयने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तर प्रियांगीने मात्र आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं आठवत नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, पुढील […]

ताज्याघडामोडी

जातीमुळे लग्नाला नकार, दोघांनी झोपेच्या १५ गोळ्या घेतल्या, त्यातून वाचले, घरच्यांनी लग्न लावलं..!

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नि आमचं अगदी सेम असतं… या ओळी प्रत्येक प्रेम प्रकरणात लागू होतीलच, असं नाही. प्रत्येकाचं प्रेम काही सारखं नसतं. प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट ही वेगळी असते. प्रत्येकाला आपलं प्रेम आयुष्यात मिळतं असं नाही. अनेक प्रेमीयुगुलांना कुटुंबीयांकडून विरोधही होतो. त्यातूनच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल प्रेमयुगुलांकडून उचललं जातं. मग या प्रेमाला पूर्णविराम लागतो. पण […]

ताज्याघडामोडी

बायकोला ऑफिसला सोडून आला, घरी आल्यावर नवविवाहीत तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल

पुण्यात किरकटवाडी येथे एका नवविवाहीत तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकटवाडी येथील भैरवनाथ नगर येथे ही घटना घडली आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तम सखाराम धिंडले (वय २७, भैरवनाथ नगर, किरकटवाडी, ता. हवेली, मुळ रा. घिसर, ता. वेल्हे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव […]

ताज्याघडामोडी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार पगारवाढ

तुम्ही जर राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ मिळणार आहे. केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दुर करण्यात आल्या असून आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार […]

ताज्याघडामोडी

मित्राला भेटायला गेला, भाजप आमदाराच्या पुत्रानं जीवन प्रवास संपवला; त्रासदायक मार्ग वापरला

झारखंडच्या धनबादमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या मुलानं आत्महत्या केली आहे. त्यानं सल्फरच्या गोळ्या खाऊन आयुष्य संपवलं. मुलाच्या अकाली निधनानं आमदाराच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पक्षानंदेखील याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भाजप आमदाराला करोनाची लागण झाली होती. करोनातून बरे झाल्यानंतर त्यांना काही त्रास जाणवू लागला. त्यामुळे ते हैदराबादमध्ये उपचार घेत आहेत. धनबादमधील सिंदरी विधानसभा मतदारसंघाचे […]

ताज्याघडामोडी

पैज लागली! १० मिनिटांत ३ क्वॉर्टर दारू संपवली; आयुष्याची बाजी लावून तरुण जिंकला, पण…

दारुचं व्यसन हे अत्यंत घातक असतं हे सर्वांनाच माहिती आहे. तरीही अनेकांना दारुचं व्यसन जडलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या शरीरावरही मोठा परिणाम होतो. अनेकदा दारुमुळे अनोकांना आपला जीव गमवावा लागतो. याची अनेक उदाहरण आपण पाहिली असेल. उत्तर प्रदेशातील आग्रा येथेही असंच काहीसं झालं आहे. जिथे, दारुमुळे एका व्यक्तीला त्याचा जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये […]

ताज्याघडामोडी

सात महिन्यांची गर्भवती, पोटात जुळी मुलं, रिक्षाची वाट पाहताना चक्कर येऊन कोसळली अन् घात झाला

नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सात महिन्यांची गरोदर माता डॉक्टरांकडे जात असताना रस्त्यात रिक्षाची वाट बघत होती. यावेळी या गरोदर मातेला अचानक चक्कर आल्याने ती खाली कोसळली. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यु झाला. तिच्यासोबत पोटात असलेल्या दोन जुळी अर्भकही मृत पावली आहेत. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. […]

ताज्याघडामोडी

शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गोव्यातील सप्तकोटेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार, उदयनराजेंनी मानले आभार

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पणजीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा गोवा सरकारकडून नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि छत्रपती घराण्याचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर उदयनराजे भोसले यांनी ट्विट करुन गोवा सरकारचे आभार मानले आहेत. पोर्तुगिज तसेच बहामनी राजवटीत भारताचा दैदिप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर १६८८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या […]

ताज्याघडामोडी

पायाला शेण लागलं, कालव्यात धुताना ३० वर्षांचा तरुण बुडाला

अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शेणाची घाण धुण्यासाठी गेला असताना पाय घसरल्यामुळे तो कालव्यात पडला. मात्र पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जहीर बेग रफीक बेग असे ३० वर्षीय युवकाचे नाव आहे. कुऱ्हा येथील बस स्थानक परिसरात त्याचे स्टेशनरीचे दुकान आहे. जहीर बेग आणि त्याचे दोन सहकारी […]

ताज्याघडामोडी

नव्या घराचं काम सुरु, पाणी मारत असताना विजेचा धक्का, डॉक्टरांची एक चूक नडली अन् होत्याचं नव्हतं झालं..!

आई, आजी, एक लहान तर एक मोठा भाऊ यांची जबाबदारी पेलणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाचं पोलीस किंवा सैन्यात जायचं अन् छोटसं घरकुल बांधायचं स्वप्न अधुरं राहिलं. आता कुटुंबाची जबाबदारी अर्ध्यावर सोडून त्याने जगाचा निरोप घेतलाय. वैद्यकीय क्षेत्रातील ढिसाळपणाचा तो बळी ठरलाय, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी अन् मित्रांनी केलाय. ही घटना औसा तालुक्यातील तांबरवाडी येथील असून […]