एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तब्बल सात वाहने पेटवून दिल्याची खळबळजनक घटना नाशिकच्या काठे गल्ली परिसरात घडली आहे. यात संबंधित तरुणीच्या दोन गाड्या आणि इतर पाच अशा सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली असून सर्व वाहने जळून खाक झाली आहेत. या घटनेनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना अटक केली आहे. […]
ताज्याघडामोडी
तीन दिवस घर बंद; अचानक दुर्गंधी, शेजाऱ्यांकडून पोलिसांना पाचारण, दरवाजा उघडताच बसला धक्का
जिल्ह्यात महाड तालुक्यातील नडगाव हद्दीमध्ये अरुण नगर या सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये रहिवाशी असलेल्या इसमाचा स्वतःच्या फ्लॅटमध्येच मृतदेह सापडला आहे. ऐन दिवाळीच्या सणांमध्ये सर्व शेजारी आणि मयत इसमाचे नातेवाईक घरात नसल्यामुळे ही बाब लवकर कोणाच्याही लक्षात आली नाही. परंतु काल सायंकाळी सर्वत्र दुर्गंधी का येत आहे असा प्रश्न निर्माण झाला. यामुळे तपास केला असता अरुण नगर […]
घरं बंद करून नेपाळला गेले, 6 महिने भाडंही दिलं, पण जेव्हा घरमालाकडे दार उघडलं, सगळेच हादरले
काही गुन्ह्यांची उकल करणं हे पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान असतं. ठोस पुरावे नसल्यास हे आव्हान आणखी कठीण होतं. कोलकाता पोलिसांसमोर सध्या अशाच प्रकारचं आव्हान आहे. कोलकात्यातल्या एका भाडेतत्त्वावर दिलेल्या घरात मानवी सांगाडा सापडला आहे. हा सापळा कोणाचा आहे या संदर्भात पोलीस सध्या तपास करत आहेत. प्रथमदर्शनी हा सांगाडा महिलेचा असावा असं बोललं जात आहे. त्याबाबत […]
शेतात अनोळखी मृतदेह, तपासताच भयंकर सत्य समोर, मित्रासोबत मिळून मोठ्या भावानेच रचला कट
सततच्या भांडणामुळे सख्ख्या मोठ्या भावाने मित्राच्या मदतीने लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना लाखनी तालुक्यातील सावरी/मुरमाडी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. आकाश रामचंद्र भोयर (वय ३१, रा. सावरी/मुरमाडी) असे मृतकाचे नाव आहे. तर राहुल रामचंद्र भोयर (वय ३३, रा. सावरी) आणि शुभम मारोती न्यायमूर्ती (वय २८, रा. नागपूर) अशी आरोपींची नावं आहेत. सावरीजवळील […]
महिला ट्रेनमधून उतरली; एकटीच घरी निघाली, फोनवर बोलत असल्याने गाफील राहिली अन् नको ते घडून बसलं
टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलने प्रवास करणारी महिला आपल्या घरी जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी नराधम निशांत चव्हाण याला अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
मुलाचं प्रेम बापाला अमान्य; तरुणीचा काटा काढण्याचं ठरवलं, कटात तरुणाची साथ अन् तरुणीसोबत विश्वासघात
आपल्या मुलाचे एका २२ वर्षीय महिलेशी असलेल्या अनैतिक संबधाला विरोध असल्याच्या वादातून बापाने मुलासह एका साथीदारानी संगनमत करून खुनाचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग गडाच्या फेनिक्युलर रोपवेच्या जवळील झुडुपांमध्ये घडली होती. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणच्या आधारे एका आरोपीला […]
राज्यात कसे असणार हवामान, पावसाबाबत IMD दिले हे अपडेट
गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. देशासह अनेक राज्यांमध्ये पावसाचे चित्र पाहायला मिळत आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि देशाच्या विविध भागात गडगडाटासह पावसाची स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील विविध ठिकाणी पावसाची […]
दिवाळीच्या दिवशी भजी बनवण्यावरुन वाद; सासऱ्याने सूनेला धारदार शस्त्राने कापलं अन्…
पश्चिम बंगालमधील हाबरा येथे दिवाळीच्या मुहूर्तावर एक हृदयद्रावक घटना घडली. क्षुल्लक कारणावरून सासरच्यांनी सुनेची हत्या केली. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हाबरा येथील श्रीनगर मठ परिसरात राहणारे 75 वर्षीय गोपाल विश्वास यांना भजी खायचे होते. त्यांची सून मुक्ती विश्वास (वय-40 वर्षे) हिने भजी तयार केले आणि त्यांना कोल्ड ड्रिंकसोबत खाण्यासाठी […]
ते फक्त 4 जण अन् 10 मिनिटांत लुटले 10 कोटींचे दागिने, दिवाळीची बंदूक दाखवून शोरुम केलं खाली!
कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीची एक अशी घटना समोर आली आहे, जी पाहून कोणीही चक्रावून जाईल. भरदिवसा थोडेथोडके नाही, तर तब्बल 10 कोटी रुपयांचे दागिने दरोडेखोरांनी लुटले. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये हा चोरीचा प्रकार घडला आहे. ज्वेलरी शोरूमचे कर्मचारी नेहमीप्रमाणे कामात व्यग्र होते. डिस्प्लेमध्ये एक एक करून मोठमोठे दागिने सजवून ठेवण्यात आले होते. सणासुदीचा काळ असल्याने शोरूम […]
शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली, डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी महत्त्वाच्या दोन बैठका बोलावण्यात आल्या होत्या. पण दुपारी दोन वाजेच्या सुमारास शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या कन्या, खासदार सुप्रिया सुळे […]










