ज्या नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस 4 आठवड्यांनंतर इच्छा असेल, त्यांना तो उपलब्ध करून देण्यात यावा, असे आदेश केरळ उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. सध्या कोव्हिशिल्डच्या पहिल्या लसीनंतर किमान 84 दिवसांनी दुसरी लस घेण्याची परवानगी दिली जाते. मात्र ज्या नागरिकांना 4 आठवड्यानंतर ही लस घ्यायची असेल, त्यांना ती लगेच उपलब्ध व्हावी, असे आदेश कोर्टानं […]
ताज्याघडामोडी
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आज महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आज महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घटना घडली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा रिक्षाचालकानी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सदर घटनेत रेल्वेचे कर्मचारी असलेल्या कामगारांनी देखील सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सदर घटनेमुळे पुण्यातचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ३१ ऑगस्टला […]
खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपसमितीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहल्यानंतर नामदार विजय वडेट्टीवार यांनी पडळकर हे नवीन गवत आहे अशी टीका केली होती.या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्यावर कमिशन खोरीसहित अनेक आरोप केले होते त्यामुळे नामदार वडेट्टीवार हे चांगलेच संतापले असून पडळकरांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, पुरावे द्यावे. त्यांनी […]
फॅबटेकची विद्यार्थिनी उजमा शेखची टेक महिंद्रा या नामांकित कंपनीमध्ये निवड
येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील उजमा शेख या विद्यार्थिनीची टेक महिंद्रा या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. टेक महिंद्रा हि महिंद्रा ग्रुपचीच एक उपकंपनी आहे. हि कंपनी माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रियेची आउटसोर्सिंग सेवा पुरवण्याचे काम […]
अनैतिक संबंध आणि पैशाचा वादातून जाळून मारण्याची धमकी दिल्यानेच भावाची आत्महत्या
ओळखीचा फायदा घेत २ लाख रुपये उसने घेतले,ओळखीचा फायदा घेत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध प्रस्तापित केले आणि हे अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर भावाने पत्नीला माहेरी घालवून दिल्याने राग धरत व उसनेने घेतलेले पैसे बुडविण्याच्या हेतून जाळून मारण्याची धमकी दिल्यानेच माझ्या भावाने स्वतःचे राहते घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे अशा आशयाची फिर्याद ३ सप्टेंबर रोजी आत्महत्या […]
करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, ड्राव्हरला एक दिवसाची पोलीस कोठडी
जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी आज करुणा शर्मा यांना कोर्टात दाखल केलं होतं. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मांना 14 […]
मद्यधुंद अवस्थेत हायवेवर डान्स, शिवसेना आमदाराने पोलिसाला शिकवला धडा
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथे मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावली. बुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर काहीजण पोलिसांची पाटी लावलेली कार रस्त्यावर उभी करुन रस्त्यातच नाचत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी […]
”विट्ठल”च्या अर्थकारणाचा ”पॉलिटिकल इफेक्ट” किती खरा किती खोटा !
विठ्ठल सहकारी साखर कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे असा आरोप २०१६ पासूनच सातत्याने होण्यास सुरुवात झाली.स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्यावर या बाबत सातत्याने टीका होताना दिसून आली.पण या साऱ्या आरोप प्रत्यारोपाच्या धुळवडीचा परिणाम थेट स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या राजकीय वाटचालीवर,निवडणुकीच्या राजकरणावर होईल असा अंदाज वेळोवेळी व्यक्त होत गेला तरी विधानसभेच्या रणधुमाळीत विठ्ठल कारखान्याची […]
करूणा शर्मा यांच्या गाडीत पोलिसांना आढळले पिस्तुल, चौकशी सुरु
आज बीड जिल्ह्यातील परळीत दिवसभर चांगलच तणावाचे वातावरण होते. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या करुणा शर्मा या आज बीड मध्ये दाखल झाल्या होत्या. करुणा शर्मा या येणार असल्याने वैद्यनाथ परिसरात स्थानिक प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जागोजागी बॅरिकेट्सदेखील लावण्यात आले होते. करुणा शर्मा ह्या वैधनाथाचे दर्शन घेण्यास गाडीतून उतरल्या असताना काही महिलांनी […]
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घाट : राज ठाकरे
पुणे महानगरपालिकेच्या तयारीसाठी मनसे तयारीला लागली आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या सर्व मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होत आहेत. एका महिन्यात राज ठाकरे यांचा 8 वा पुणे दौरा आहे. आज बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, ओबीसी आरक्षण मुद्दा निकालात निघेपर्यंत निवडणूक स्थगिती दिली […]











