रुग्णालयात काम करणाऱ्या २१ वर्षीय पारिचारिकेने ऑन ड्यूटी असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकातील अथर्व हॉस्पिटल येथे रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अकिना शाजी (वय-२१ वर्ष, रा. इकाड, राज्य केरळ ह. मु. अथर्व हॉस्पिटल, स्वातंत्र्य चौक, जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्या करण्यामागचे कारण […]
ताज्याघडामोडी
‘न्यु सातारा’ चा विद्यार्थी अथर्व देवकर याची महिंद्रा प्रा. लि.पुणे या कंपनीत निवड
पंढरपूर कोर्टी- येथील न्यु सातारा पॉलिटेक्निक मध्ये घेतलेल्या मुलाखतीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्याची Mahindra Pvt.Ltd.Pune या कंपनीत निवड झाली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री .राजाराम निकम साहेब यांनी दिली. Mahindra Pvt.Ltd.Pune या कंपनीने न्यु सातारा कॉलेज ऑफ पॉलीटेक्निक मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्याची […]
आधी पत्नी-पुतण्याला संपवलं, मग स्वत:वर गोळी झाडली
अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी आपल्या पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:लाही संपवलं. पुण्यात सुटीवर आलेल्या गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याला संपवून नंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. पुणे शहरातील बालेवाडी परिसरात सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. भारत गायकवाड हे अमरावती […]
भाळवणी ग्रामीण रुग्णालयाला मान्यता; दोन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश
भाळवणी (ता. पंढरपूर) येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे याकरिता परिसरातील गावांमधून नागरिकांची सातत्याने मागणी होत होती. त्या अनुषंगाने तात्कालीन जिल्हा परिषद सदस्या शोभाताई वाघमोडे देशमुख व पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांचे मार्फत प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाळवणी ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. अखेर शासनाने […]
मित्रांसोबत गप्पा मारणं ठरलं अखेरचं; दुचाकीवरून आले अज्ञात अन् सगळं संपलं
शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोधले नगर परिसरात एका २१ वर्षीय युवकाचा हत्या झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास दुचाकीवर ट्रीपल सीट आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत त्याचा खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे […]
“…हा आततायीपणा आहे”, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर गिरीश महाजनांचं विधान
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. यातील काही बॅनर्सवर अजित पवारांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनीही त्यांच्या मनातील इच्छा उघडपणे बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी […]
ऑनलाइन गेमच्या नावाखाली व्यावसायीकाची ५८ कोटींनी फसवणूक
ऑनलाइन गेमच्या नावावर सट्टा लावून जास्त नफ्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाची ५८ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून गोंदियातील आरोपी अनंत नवरत्न जैन याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. जिथे पोलिसांनी 10 कोटींहून अधिक रोख रकमेसह चार तोळ्यांहून अधिक किमतीचे सोने जप्त केले आहे. सध्या या पैशांची मोजणी सुरू […]
बहिणीला संपवलं, शिर धडावेगळं; मुंडकं हातात घेऊन भाऊ गावभर फिरला; ग्रामस्थांचा थरकाप उडाला
उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये प्रेम प्रकरणातून एका भावानं धारदार शस्त्रानं त्याच्या बहिणीचा गळा कापून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपी बहिणीचं शिर हातात धरुन गावभर फिरत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी आरोपी भावाला अटक केली. त्याच्या हातात तेव्हादेखील कापलेलं शिर होतं. घटनेमुळे पूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आरोपीला शिर हातात धरुन चालताना पाहणाऱ्या […]
न्यु साताऱ्याच्या दोन विद्यार्थ्यांची writegen india pvt.ltd.pune या कंपनीत निवड
पंढरपूर कोर्टी – येथील न्यु सातारा पॉलिटेक्निक मध्ये घेतलेल्या मुलाखतीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील दोन विद्यार्थ्यांची writegen india pvt. ltd ,pune या कंपनीत निवड झाली असून त्यांना वार्षिक पॅकेज 2.10 लाख रुपये आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री .राजाराम निकम साहेब यांनी दिली. writegen india pvt. ltd ,pune या कंपनीने न्यु सातारा कॉलेज […]
भर पावसात मित्रांसोबत पोहायला गेला, पाण्यात मारलेली उडी अखेरची ठरली,दोन दिवसानंतर सापडला, पण…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. ठाण्यातील अंबरनाथमध्ये दोन दिवसांपूर्वी एक युवक वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरु होता. अखेर त्याचा मृतदेह उल्हासनगरमध्ये वालधूनी नदीच्या काठावर आढळला आहे. राहील उर्फ काळू शेख असं मृत तरुणाचं नाव आहे. अंबरनाथमध्ये दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला आहे. अंबरनाथ स्थानकापासून […]