सांगोला : फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, च्या संशोधन आणि विकास विभागाने “तांत्रिक शिक्षणातील प्रकल्प मार्गदर्शकांची भूमिका” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष व्ही.जाधव यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांकडून दर्जेदार संशोधन कार्य कसे करून घ्यावे, विद्यार्थ्यांच्या प्रकल्प उपक्रमाचा उपयोग समाजासाठी फायदेशीर उत्पादने तयार करण्यासाठी कसा करायचा आणि विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य कसे प्रकाशित करायचे याविषयी त्यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस चे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. […]
ताज्याघडामोडी
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकास मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी नामे दिपक संभाजी काळे रा. येड्राव ता. मंगळवेढा यास मुंबई उच्च न्यालयाचे न्यायमुर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी की,- सदरील घटनेतील फिर्यादी नामे दिपक कुंडलिक ढावरे हा आहे.. फिर्यादी याचा भाऊ हनमंत ढावरे याचे एका महिलेशी संबंध असलेचा संशय होता. या संबंधातून त्याला […]
नवऱ्याचं लफडं; बायकोनं ऑफिसमधून पळवत इंजिनिअर नवऱ्याला चपलेने धुतलं
विवाहबाह्य संबंधांमुळे नात्यामध्ये दरी निर्माण होते. त्यामुळे भांडणं होऊ शकतात. अन् अखेर एकेदिवशी ते नातं संपून जातं. त्यामुळे नवरा-बायकोच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा हवा असा सल्ला जेष्ठ मंडळी देतात. मात्र तरी देखील काही मंडळी ऐकत नाहीत. अशाच एका पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पत्नीच्या नकळत तो त्याच्याच ऑफिसमधल्या एका महिलेला डेट करत होता. पण हुशार बायकोनं थेट ऑफिस […]
खेळताना पाय घसरला, आठव्या मजल्यावरून थेट डक्टमध्ये पडले, अडीच वर्षांच्या लेकीसह बापाचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्रायणी नदी लगत असणाऱ्या इंद्रायणी वाटिका या इमारतीच्या आठव्या मजल्याच्या डक्टमध्ये पडून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोकाचे वातावरण पसरले आहे. रमेश मारुती लगड (वय ३४, रा. इंद्रायणी वाटिका, […]
लिव्ह इनमध्ये सुखात राहायचे, वादाचा भडका, मग क्षणात सारं संपलं, मित्राला फोन अन्
नागपूर येथील वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंबेडकर नगर त्रिशरण चौकात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे समोर आले आहे. हा हल्ला एवढा जोरदार होता की त्यात मृत महिलेच्या पाठीचा कणाही तुटला आहे. प्रणाली डहाट (३२ वर्षीय, रा. आंबेडकर नगर वाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर ललित दहाट (३८ वर्षीय) […]
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वरुणराजाचं पुनरागन झालं आहे. मराठवाडा, कोकण, मुंबई आणि विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.त्यामुळं सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच आता विदर्भ, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत […]
शिवसेना-राष्ट्रवादीच्या बंडखोरांना नाना पटोले म्हणाले कुत्री मांजरं? वाचा काय आहे प्रकरण…
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पाडण्यात केंद्रातील भाजपा सरकारचा हात असल्याचा आरोप वारंवार महाविकास आघाडीकडून केले. शिवसेना पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून केंद्रातील सरकार हे राज्यातील सरकार तोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. तर काँग्रेस पक्षातील कोणीही भाजपासोबत जाणार नसून, आमचा पक्ष कुत्र्या मांजरांचा नाही तर वाघाचा असल्याचा […]
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती
आघाडीच्या राजकारणाची देशात अपरिहार्यता झाली आहे. त्यामुळेच आम्ही ‘एनडीए’मध्ये सहभागी झालो आहोत. आगामी निवडणुका आम्ही आमचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावर लढविणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. […]
कामावरुन काढल्याचा राग, पुण्यात मॅनेजरची हत्या, दारांना कड्या लावून पळाला खरा, पण…
शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामावरुन काढल्याच्या रागातून एका कामगाराने आपल्या मॅनेजरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील वडनेर येथे गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली होती. आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान (वय […]
भरबाजारपेठेत भाजी विक्रेत्याचा सपासप वार करून खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी टोळक्याच्या मारहाणीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही दिवस होत नाही तोच नाशिकमधील सिडको परिसरात 4 ते 5 अज्ञातांनी एका भाजी विक्रेत्यांची भरदिवसा हत्या केल्याची घटना गुरुवारी घडलीय. भाजी विक्रेत्यावर धारधार शस्त्रानं हल्ला झाल्यानं नाशिक शहर पुन्हा हादरलंय. या प्रकरणात पोलिसांनी चार […]











