गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत वकिलाचा महिलेवर बलात्कार

एका वकिलाने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित तयार केली. तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार देऊन विश्वासघात केला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी वकिलावर गुन्हा नोंदविला आहे. रियाज ताज मोहम्मद शेख (४३) रा. गणेशपेठ असे आरोपीचे नाव आहे. रियाज शेख हा स्वत:ला वकील असल्याचे सांगतो. […]

ताज्याघडामोडी

शिवसेना आणि शिंदे गटात पुन्हा राडा, आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप, गुन्हा दाखल

गणपती विसर्जनापासून सुरू झालेला एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील राडा काही संपताना दिसत नाही. गणेश विसर्जनाच्या वेळी ही एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि शिवसेनेमध्ये प्रभादेवी येथे राडा झाला होता. दोन्हीही गट एकमेकांसमोर येऊन धिडले होते. मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक झाली होती. मात्र काल रात्री पुन्हा एकदा […]

ताज्याघडामोडी

स्वेरी मध्ये दि. १५ व दि १६ सप्टेंबर रोजी ‘ऑलम्पस २ के २२’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात येत्या दि. १५ व दि १६ सप्टेंबर रोजी ‘ऑलम्पस २ के २२’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाच्या पोस्टरचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.         ‘शिक्षक दिना’चे औचित्य साधून ‘ऑलम्पस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या भावाचा अपहरण करून खून

पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या भावाचा अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असली तरी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाचे वय 7 वर्षे आहे. या प्रकरणी मंथन किरण भोसले आणि अनिकेत श्रीकृष्ण समदर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बहिणीला नांदवत का नाही विचारले; संतापलेल्या भावोजीने मेव्हण्यालाच संपवले

तालुक्यात अनंत चतुर्दशीच्या रात्री घडलेल्या हत्याकांडाने प्रचंड खळबळ उडाली आहे. बहिणीला नांदवत नसल्याच्या कारणावरून वाद झाला आणि भावोजीचा पारा चढला. भावोजीने मागेपुढे न पाहता मेहुण्या ला थेट संपवून टाकला. या हत्ये मुळे कराडसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे. कराड तालुक्यातील उंडाळे गावातील माळी वस्ती येथे काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच […]

ताज्याघडामोडी

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र…; १७ वर्षीय तरुणाने गमावला जीव

चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावात राहणारा सौरभ शत्रुघ्न मोरे (वय-१७) हा आपला भाऊ व आई यांच्यासह वास्तव्याला आहे. लहान मुलांच्या गणपती मंडळात सौरवने भाग घेतला होता. दरम्यान, आज गणेश विसर्जनाच्या कार्यक्रम असल्याने तीन मित्रांसोबत अंबुजा कंपनीच्या मागे असलेल्या डोहात गणपती विसर्जनासाठी तो गेला होता. सौरवने गणपती बुडविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. यावेळी सोबत असलेले दोन मित्र […]

ताज्याघडामोडी

मा.आ.परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त 42 कुटूंबांना घरासाठी पन्हाळी पत्र्याचे वाटप

संदिप माने यांचा स्तुत्य उपक्रम सोलापूर विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पै.संदिप माने यांच्यावतीने पंढरपूर शहरातील 42 कुटूंबांना घरावरील पन्हाळी पत्र्याचे वाटप करून सामाजिक उपक्रमाने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सदरचा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे घेण्यात आला. यावेळी प्रत्येक कुटूंबाला 5 पत्रे देण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून […]

ताज्याघडामोडी

सिंहगडच्या पुनम सावंतची ३ मल्टिनॅशनल कंपनीत निवड

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या जित्ती (ता. मंगळवेढा) येथील कुमारी पुनम विलास सावंत हिची ३ वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली. कोर्टी येथील सिंहगड काॅलेज मधील अनेक विद्यार्थ्यांनी विविध नामांकित कंपनीत निवडले जात आहेत. काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यात 11सप्टेंबरपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन  प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून हवामान विषय मिळालेल्या पूर्व सुचनेनुसार सोलापूर जिल्हयात 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत जिल्हयात अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची आणि विजा चमकण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी […]

ताज्याघडामोडी

उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता

सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना उजनी धरणात आज दुपारी 1.00 वाजता उपयुक्त पाणीसाठा 108.08% इतका झाला आहे. सद्यस्थितीत दौंड येथील भीमा नदीवरील सरीता मापन केंद्राच्या खालील बाजूस उजनी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू आहे. उजनी धरणातून भीमा आणि सीना नदीमध्ये विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने पुरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना […]