ताज्याघडामोडी

कोरोना नियमांचे पालन न करण्यांवर दंडात्मक कारवाई नागरिकांकडून 13 लाख 48 हजार रुपयांचा दंड वसूल,38 जणांवर गुन्हे दाखल                                उपविभागीय पोलीस अधिकारी-विक्रम कदम

पंढरपूर, दि. 13:- सोलापूर जिल्ह्यांत शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनामार्फत  दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, 3 हजार 214  नागरिकांकडून  13 लाख 48  हजार 200  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच  उल्लंघन करणाऱ्या 38 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम  यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा संसर्ग वाढू नये यासाठी  जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी  तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच विविध निर्बंधही घातले आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  पंढरपूर पोलीस प्रशासनाच्यावतीने शहर व ग्रामीण भागात जनजागृती करुन  मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आदीबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे.  तरीही  काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत आहे. अशा नागरिकांवर पोलीस प्रशासनामार्फत  कारवाई करण्यात येत आहे.  या अनुषंगाने  दिनांक 1 जानेवारी ते 12 मार्च 2021  या कालावधीत मास्क न वापरणाऱ्या 3 हजार 59  नागरिकांवर कारवाईद करुन  13 लाख 32 हजार 700 रुपये व गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या 155 नागरिकांकडून 15 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंध कायद्यातंर्गत कलम 188 अन्वये 38 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहितीही श्री.कदम यांनी  दिली

          नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे तसेच मास्कचा वापर करावा , गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे, प्रशासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, जे नागरिक कोरोनाबाबत नियमांचे उल्लघन करतील त्यांच्यावर दंडात्मक तसेच साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल  अशा इशाराही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी यावेळी  दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *