ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल कारखान्याची जीएसटीने बँक खाती उघडली-  भगीरथ भालके

श्री विठ्ठल कारखान्याची जीएसटीने बँक खाती उघडली-  भगीरथ भालके

पंढरपूर, दि. १३ : पंढरपूर तालुक्‍यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सिल केलेली ७ ही बँक
खाती जीएसटी विभागाने शुक्रवार दि.१२.॥३.२॥२१ रोजी खुली केली असल्याची माहिती अध्यक्ष श्री भगिरथ
भालके यांनी दिली. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफञरपीचे संपूर्ण पैसे लवकरच दिले जातील अशी ग्वाही

दिली.

आपले श्री विठठल सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २0१९-२0 आपण घेऊ न शकल्यामुळे मागील सन
२०१८-१९ ची जीएसटीची थकबाकी राहिलेली होती. गळीत हंगाम २0२0-२१ सुरू होताना कै.भारतनाना भालके
व संचालक मंडळ यांनी वेळोवेळी पुणे येथे जीएसटी ऑफीसला जाऊन थकीत जीएसटीबाबत संबंधीत
अधिकाऱ्याबरोबर चर्चा करून रक्‍कम र.५.८२ कोटी जीएसटीकडे भरले होते. उर्वरीत रकमेस वेळ मागून घेतलेला
होता, गळीत हंगाम २0२0-२१ मधील जीएसटीची सर्व रक्‍कम कारखान्याने भरलेली असून मागील रक्‍्कमेपैकी
९.८.५0 कोटी जीएसटीकडे कारखान्याने भरणा केलेला आहे व उर्वरीत रक्‍कमही कारखाना जीएसटीकडे भरणा
करीत आहे. कारखान्याचे चेअरमन मा.श्री भगिरथदादा व संचालक मंडळातील सदस्यांनी जीएसटी सहआयुक्‍त
यांची भेट घेवून त्यांना थकीत जीएसटीबद्दल तपशिलवार माहिती दिली.जीएसटी सहआयुक्त यांनी कारखान्याने
यावर्षी जीएसटीकडे भरलेल्या रक्‍कमांची माहिती घेवून शुक्रवार दिनांक १२.0३.२०२१ रोजी कारखान्याची बंद
केलेली बँक अकौंट पुन्हा खुली करणेबाबत संबंधीत बँकांना आदेश दिले.

 

कै.भारतनाना भालके यांचे ध्येय धोरणानुसार कारखान्याचे कामकाज मा.संचालक मंडळ पहात असून
त्यांनी त्यांचे कार्यकाळात सभासदांची ऊसविलाची कोणतीही रक्‍कम बाकी ठेवलेली नाही, त्याचप्रमाणे गळीत
हंगाम २0२0-२१ मधील गळीतास आलेल्या ऊसाची एफआरपी प्रमाणे सर्व रक्‍कम सभासदाना देणेसाठी
मा.संचालक मंडळ कटिबध्द असून लवकरच सभासदांना गळीतात आलेल्या ऊसाची एफआरपी प्रमाणे रक्‍कम
अदा करणार आहोत, कारखान्याबाबत संभासदांमध्ये काही मंडळी गैरसमज परवित आहेत व सोशल मिडीयावर
काही अफवा पसरविल्या जात आहेत. या भुलथापावर सभासदानी विश्‍वास ठेवू नये असे अवाहन भगिरथ भालके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *