चंद्रभागानगर, भाळवणी दि.04- येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री.कल्याणराव काळेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे याचे शुभहस्ते सुरक्षिततेची शपथ ग्रहण करुन करण्यात आला.
सदर प्रसंगी कारखान्याचे डेप्यु.जनरल म्ॉनेजर के.आर.कदम यांनी 4 मार्च ते 11 मार्च या कालावधीत दरवर्षी देशात सर्व ठिकाणी औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजारा करण्यात येत असून औद्योगिक क्षेत्रात सुरक्षेला फार महत्व आहे. सुरक्षेचे नियम केवळ या सप्ताहापुरतेच मर्यादित न ठेवता आयुष्यभर सुरक्षा नियमांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन केले. तसेच काम करीत असताना अपघात होवुन,स्वत:वर व आपल्यावर अवलंबुन असणाऱ्या कुटुंबावर परिणाम होवू शकतो याचे भान काम करीत असताना सर्वांनी ठेवले पाहिजे. आयुष्यभर अपघात विरहित काम करुन,स्वत:बरोबरच आपले कुटुंब सुरक्षित रहावे याची दक्षता घ्यावी.
यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे,चिफ इंजिनिअर एस.एन.औताडे,प्रॉडक्शन म्ॉनेजर एन.एम.कुंभार,डेप्यु.चिफ.अकौंटं ट बी.एस.सोनवले,एन.व्ही.कौलगे,का र्यालय अधिक्षक सी.एस.गायकवाड,गोडाऊन किपर कल्याण जाधव,असि सुरक्षा आधिकारी बी.एस.पिसे,जमादार मनसुब सय्यद, सुरक्षा जवान व कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन लेबर ऑफिसर आर.बी.जाधव यांनी केले.