Uncategorized

पंढरपूरचे प्रसिद्ध गायक निवेदक रफिक शेख यांचा महाराष्ट्र ग्रेट सिंगर आयकॉन पुरस्काराने गौरव

विना इंटरनॅशनल पब्लिकेशन कोल्हापूर व जिव्हाळा कलामंच यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे दिनांक २१- ०२ – २०२१ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सिनेतारका व निवेदिका डॉ समीरा गुजर यांच्या हस्ते रफिक महबूब शेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

        रफिक शेख हे गायक निवेदक म्हणून गेली अनेक वर्ष संगीत कलेच्या माध्यमातून  महाराष्ट्र-कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये पार्श्व गायक यांच्यासोबत निवेदक व गायक म्हणून रसिकांचे मनोरंजन करीत आले आहेत.तसेच रफिक शेख यांचा सामाजिक कार्यातही उल्लेखनीय वाटा असून विविध सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा वेळोवेळी गौरव झाला आहे. त्यांच्या  या कार्याची दखल घेत रफिक शेख यांना महाराष्ट्र ग्रेट सिंगर आयकॉन अवार्ड प्रदान करण्यात आला आहे.  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *