ताज्याघडामोडी

पाऊस, वादळी वाऱ्यात घराचे पत्रे उडाले अन् आईचं काळीजही, तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरवला आहे. एवढचं नव्हे तर वीज कोसळून जीवितहानी होत आहे. राज्यात अनेकांचा मृत्यू झाला असून जनावरेही दगावली आहेत. आता या अवकाळी पावसाने चिमुकल्याचाही बळी घेतला आहे.

साक्री तालुक्यातील उमरपाटा येथे सलग दोन तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस कोसळतोय. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परवा संध्याकाळी सुमारास ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे परिसरातील अनेक घरांचे पत्रे उडून गेले. तर अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याचे तसेच शेतातील कांदा, भाजीपाला, कलिंगड आणि खरबूज मळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

उमरपाटा शिपरतील गावठाण पाड्यातील विशाल मगन देसाई यांच्या घराच्या पत्र्यांसह अँगलही जोरदार वादळी वाऱ्यामुळे ७० ते ८० फूट लांब उडून गेले. त्याच पत्र्याच्या अँगलला लहान मुलांसाठी झोळी बांधली होती. त्या झोळीसह अँगलही उडून गेल्याने तीन महिन्यांचे बाळ गंभीर जखमी झाले. त्याला तात्काळ धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. पण ह्या बाळाचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *