Uncategorized

अप्रमाणित,भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री करणाऱ्यांवर शासनाचे कठोर कारवाईचे आदेश

खाद्यतेलांत भेसळ करून जर कुणी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. याविरोधात अन्न व औषध विभागाची मोहीम अधिक तीव्र करण्याबरोबरच खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज अधिकाऱ्यांना दिले आज दिले आहेत.त्यामुळे राज्यातील भेसळयुक्त व अप्रमाणित खाद्य तेल विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच अन्न विभागाकडून अनेक खाद्यतेल उत्पादक व विक्रेते यांच्यावर धाडी टाकल्या जातात.या धाडीत भेसळयुक्त अथवा अप्रमाणित असलेला साठा अन्न विभाग सील करते मात्र सील केलेला साठा तपासणी रिपोर्ट येईपर्यंत तसाच ठेवून इतर उत्पादित साठ्याची विक्री होत असल्याची चर्चा होत आली आहे.अन्न विभाग मात्र याबाबत कारवाई करीत नाही अशीच चर्चा ग्राहकांमधून होत असतानाच आता थेट अन्न विभागाने अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असून अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज दिलेल्या आदेशामुळे नागरिकांमधून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे. 
              राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये खाद्य तेलांमध्ये भेसळ होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत, याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.  त्यावेळी ते बोलत होते.
खाद्य तेलातील भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना, भेसळ ओळखण्यासाठी जनजागृती, भेसळ करणारी दुकाने, कंपन्या, आस्थापना, दुकानदारांवर धाडी टाकून कडक कारवाई करावी. तसेच खाद्य तेलात वारंवार भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचे अन्न परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्र्यांनी दिले. याबरोबरच मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण या विभागांचा आढावा घेतला. खाद्य तेलाबरोबरच प्रतिबंधित अन्न पदार्थ, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ यामधील भेसळीविषयी विभागाने सतर्क राहून भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी. या माध्यमातून राज्यातील जनतेच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. या कारवायांबाबतचा अहवाल 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
    या बैठकीस अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सह सचिव शिवाजी पाटणकर, अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाचे सहआयुक्त शैलेश आढाव, बृहन्मुंबई विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे, कोकण विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख, पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, नाशिक विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे, औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त उदय वंजारी, अमरावती विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे, अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त महेश चौधरी, अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाच्या अन्न सुरक्षा अधिकारी अर्चना वानरे आदि उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *