ताज्याघडामोडी

पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार 4 लक्ष 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार

पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार 4 लक्ष 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार

पहा कुठल्या जिल्ह्यात कुठल्या वयोगटातील किती आहेत शिक्षक व पदवीधर मतदार 

पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्‍या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघाच्‍या एका जागेसाठी 35 उमेदवार उभे आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार 4 लक्ष 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार आहेत.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदारांची संख्‍या जिल्‍हानिहाय पुढीलप्रमाणे –पुणे – पुरुष  89 हजार 626, स्‍त्री 46 हजार 958, इतर 27 (एकूण 1 लक्ष 36 हजार 611), सातारा जिल्‍हा –  पुरुष 39 हजार 397, स्‍त्री 19 हजार 673, इतर 1  (एकूण 59 हजार 71 ), सांगली – पुरुष  57 हजार 569, स्‍त्री 29 हजार 661, इतर 3  (एकूण 87 हजार 233), कोल्‍हापूर  – पुरुष  62हजार 709 , स्‍त्री 26हजार 820, इतर 0  (एकूण 89 हजार 529) आणि सोलापूर जिल्‍हा – पुरुष  41हजार 70, स्‍त्री 11 हजार 742, इतर 1  (एकूण  53  हजार 813).

शिक्षक मतदार संघातील मतदारांची संख्‍या जिल्‍हानिहाय पुढीलप्रमाणे- पुणे – पुरुष  15हजार 807, स्‍त्री 16हजार 371, इतर 23  (एकूण 32 हजार 201), सातारा जिल्‍हा – पुरुष  5हजार 121, स्‍त्री  2 हजार 589 , इतर 1  (एकूण 7 हजार 711), सांगली – पुरुष  4 हजार 826, स्‍त्री 1 हजार 985, इतर 1   (एकूण 6 हजार 812 ), कोल्‍हापूर – पुरुष  8हजार 878, स्‍त्री 3हजार 359,  इतर 0  (एकूण 12हजार 237) आणि सोलापूर जिल्‍हा – पुरुष  10 हजार 561, स्‍त्री  3 हजार 23, इतर 0  (एकूण 13हजार 584).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *