ताज्याघडामोडी

पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट

पुणे,सातारा,कोल्हापूर मुसळधार बरसणार  

 पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही दिला आहे. गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे.कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय. गडचिरोली, गोंदिया येथे रेड अलर्ट दिला आहे. पुणे  सातारा  कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही  दिला आहे. गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. गेल्या 24 तासात कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या द्रोणीय स्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे कोकणातील बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्हायत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक परिसरातील घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *