ताज्याघडामोडी

भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक सोनालिका 26 HP ट्रॅक्टरचे ऑनलाइन पद्धतीने लॉंचिंग- अभिजीत पाटील*

 

              पंढरपूर येथील डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे भारतातील पहिल्या इलेक्ट्रीक सोनालीका 26एच पी या टॅक्ट्ररच्या ऑनलाईन पद्धतीने लाॅचिंग करण्यात आले आहे यावेळी अभिजीत पाटील, कुलदिपसिंग सर, बलजिंदर सिसोदीया, अशितोष सिंग, सुरेंद्रर ठाकूर व अभिजीत कदम व मॅनेजर सोमनाथ केसकर यांची उपस्थित होती.

              राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सोनालिका इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे ऑनलाईन पध्दतीने लाॅचिग करण्यात आले असून याट्रॅक्टरची बुकिंग आजपासून सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होऊन फवारणी आणि शेतीच्या मदतीला आता घरीच शेतकऱ्यांना मदत होईल. हा ट्रॅक्टर घरीच चार्जिंग करू शकतो, ट्रॅक्टरचा चालू केल्यानंतर आवाज येत नाही, त्याचबरोबर या ट्रॅक्टरचा मेंटेनेस खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा आहे.ट्रॅक्टर ताशी 24.99 किलोमीटर या वेगाने धावतो या ट्रॅक्टर मुळे प्रदूषण होत नाही असा हा पहिलाच इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर सोनालिका कंपनीने तयार केलेला आहे.

                तरी यावेळी अभिजीत पाटील म्हणाले की, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर करावा. सोनालीका ट्रॅक्टर कंपनी भारतात टाॅप वरती आहे .आशिया खंडात एक नंबर वरती असणारी कंपनी आहे . या कंपनीने आज पर्यंत अनेक देशात आपले नाव कमावले आहे .अनेक परदेशात सोनालीका कंपनीचे विशेष ग्राहक आहेत .सोनालीका ट्रॅक्टर कंपनीने भारतात मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. सोनालीका ट्रॅक्टर हा शेतकर्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे शेतातील लहान मोठ्या मेहनती साठी सज्ज असतो .ट्रॅक्टरला आवरेंज चांगले आहे त्यातच सोनालीका ट्रॅक्टर कंपनीने इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर बाजारात लाॅचिंग केल्या मुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *