ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

लग्नसमारंभात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रांताधिकारी ढोले यांचे आवाहन

 

        पंढरपूर, दि. 11:- तालुक्यात शहरासह  ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्ण मोठ्याप्रमाणात सापडत आहेत. लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त गर्दी होत आहे.  सार्वजनिक कार्यक्रमामध्ये  गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून, मर्यादित आप्तेष्टांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरे करावेत असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

            लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमा निमित्त होणारी गर्दी तसेच कार्यक्रमामध्ये  मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न ठेवणे यामुळे कोरोना बाधित  रुग्णात  वाढ होत  आहे . आयोजकयांनी  तसेच मंगल कार्यालय मालकांनी कोरोनाबाबत  शासनाने  दिलेल्या नियम व अटीचे पालन करावे लग्न समारंभाचे ठिकाणी जास्तीत जास्त 100 व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर राहील याची दक्षता घ्यावी. लग्नसमारंभाचे ठिकाणी बसण्यासाठी व जेवण करताना सामाजिक अंतर राहील याची दक्षता घ्यावी.  समारंभास जेष्ठ नागरिक व लहान मुलांची उपस्थितीती राहणार याची काळजी घ्यावी. कार्यक्रमात नातलग  व मित्र परिवार भेटल्याने विना मास्क तसेच सामाजिक अंतर न ठेवता गप्पागोष्टी करु नयेत. लग्न समारंभाचे ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक  मास्क वापरणे बंधनकारक राहील.

       लग्न समारंभाची जागा, लग्नाचे ठिकाण, जेवणाचे ठिकाण, स्वच्छतागृह इत्यादी ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करुन वारंवार निर्जतुकीकरण करावे. तसेच स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी साबणाची  व सॅपनेटायझरची व्यवस्था करावी. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक कार्यक्रमात व लग्न समारंभात शासनाने दिलेल्या नियमांचे व अटींचे पालन करावे असे, आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *