ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

ऐतिहासिक बाजीराव विहिर बचावासाठी राष्ट्रीय समाज पक्ष जनआंदोलन उभारेल-पंकज देवकते 

 

ऐतिहासिक बाजीराव विहिर बचावासाठी राष्ट्रीय समाज पक्ष जनआंदोलन उभारेल-पंकज देवकते 

      पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जलदगतीने सुरु आहे. या मोहोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्ग क्रमांक 965 मध्ये वाखरी भंडीशेगाव येथील महाराष्ट्र शासन गट क्रमांक 134 मध्ये ऐतिहासिक बाजीराव विहिर आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली पंढरीची वारी आणि त्या वारीतील ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज पालखी भेट वाखरी रिंगण ऐतिहासिक बाजीराव विहिर या गोष्टी आजपर्यंत युगानयुगे चालत आलेली संस्कृती आणि ऐतिहासिक ठेवाच जर मिटवला जात असेल तर वारकरी आणि विठ्ठल रुक्मिणी भक्तांसाठी हा पालखी महामार्गाच्या रुंदीकरणाचा उठाठेव करुन उपयोग काय असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि सर्व भक्तांसाठी ही विहिर बचावासाठी राष्ट्रीय समाज पक्ष जन आंदोलन उभारेल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे पंकज देवकते,ॲड.शरदचंद्र पांढरे यांनी जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना भेटुन लेखी निवेदनाद्वारे दिला.तर पंढरपूर येथे भुसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिनजी ढोले साहेब यांना रासपचे संजय लवटे सर,महाळाप्पा खांडेकर यांनी निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *