

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय “आदर्श समाजसेवक’ पुरस्कार आण्णासाहेब धोत्रे यांना प्रदान
पंढरपूर- पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने देण्यात येणारा “आदर्श समाजसेवक 2020′ हा पुरस्कार पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते पिराजी उर्फ आण्णासाहेब लक्ष्मण धोत्रे यांना पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी समितीचे राज्यस्तरीय व जिल्ह्यातील सर्व पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते.
पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब धोत्रे यांनी आजपर्यंत अनेक प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविलेले आहेत. ते नेहमीच विविध उपक्रम राबवून समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेवून त्यांना आदर्श समाजसेवक हा पुरस्कार देण्यात आला. याबद्दल समस्त हनुमान तालीम संतपेठ पंढरपूर व गणेश मित्रमंडळ यांच्यावतीने आण्णासाहेब धोत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सिध्देश्वर बागडे, हरिभाऊ क्षिरसागर, पांडुरंग कांबळे, शरद पवार, गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरज बनकर, सुनिल धोत्रे, अमर ऐवळे, आदम बागवान, पिंटू ओतारी, बाळासाहेब बामणी, दशरथ लोखंडे, अमोल दाभाडे, शाम कांबळे, अभिराज धोत्रे, शंकर लंबाटे यांच्यासह संतपेठ येथील रहिवाशी उपस्थित होते