ताज्याघडामोडी

वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य ! राज ठाकरे

वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य ! राज ठाकरे
मुंबई :अश्र्विन वद्य एकादशी दिनांक ११ रोजी वारकरी संप्रदाय ‘कार्तिकी यात्रा समन्वय समिती’ शिष्टमंडळाची आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे सोबत आज ‘कृष्णकुंज’ येथेबैठक पार पडली.
आषाढी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाने कोरोना पार्श्वभूमीवर परंपरांवर अनेक निर्बंध सोसत शासनास संपुर्ण सहकार्य केले होते,मात्र आता बाजारपेठा सहीत सर्व गोष्टी खुल्या होत असताना येत्या कार्तिकी यात्रेसाठी शासनाने निर्बंध लादू नयेत या करिता स्वतः संप्रदायाने कार्तिकी यात्रा नियोजन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार यात्रा पार पाडावी अशी घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेद्वारे संप्रदायाने केली होती. त्यास प्रतिसाद देत  वारकरी संप्रदायाला चर्चेसाठी आमंत्रित करत संप्रदायाची कार्तिकी यात्रा संदर्भात समन्वयाची भूमिका श्री.राज ठाकरे यांनी समजून घेतली .” वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य असून ती शासनापर्यंत पोहचवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे” असे आश्वासन त्यांनी यावेळी वारकरी संप्रदाय ‘कार्तिक यात्रा समन्वय समितीच्या’ शिष्टमंडळास दिले. 
           या बैठकीस सर्वश्री ह.भ.प.देवव्रत (राणा) महाराज वासकर, चैतन्य महाराज देहूकर, निवृत्ती महाराज नामदास,भागवत महाराज चवरे, रंगनाथ (स्वामी) महाराज राशिनकर, विठ्ठल महाराज चवरे,भरत महाराज अलिबागकर,भागवत महाराज हंडे, गणेश महाराज कराडकर ,शाम महाराज उखळीकर,इ.यासह मनसेचे  मा.श्री.बाळा नांदगावकर, मा.श्री.नितीन सरदेसाई,मा.श्री.दिलीप धोत्रे. इ.उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *