ताज्याघडामोडी

धाराशिव कारखान्याने शेतकऱ्यांना २००रू व दिवाळीसाठी साखर वाटप करून शेतकऱ्यांची दिवाळी केली गोड

धाराशिव कारखान्याने शेतकऱ्यांना २००रू व दिवाळीसाठी साखर वाटप करून शेतकऱ्यांची दिवाळी केली गोड

 

पंढरपूर- कोरोना महामारीच्या काळात व अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कितपत गोड होईल याबाबत शंका उपस्थित होत असताना पंढरीतील डिव्हीपी उद्योग समूहाच्या धाराशिव साखर कारखान्याने शेतकऱ्यांना दिवाळी गोड व्हावी म्हणून २०० रुपयांचा तिसरा हाप्ता व साखर वाटप करून जुन्या दिवसांची आठवण करून दिली आहे.यामुळे दोन दोन वर्षांपासून ऊस बिले थकवून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक कारखान्यांसमोर हा एक आदर्श मानला जात आहे.

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पोळा व दिवाळी हे महत्वाचे सण असतात, कै.औदुंबर आण्णा पाटील यांच्या काळात या सणांची शेतकऱ्यांना ओढ लागलेली असायची.कारण या दोन्ही सणांच्या वेळी साखर कारखान्यांकडून ऊस बिलांचे हप्ते शेतकऱ्यांना मिळत असायचे.त्यामुळे सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेत धाराशिव कारखान्याने जुन्या परंपरेला उजाळा देत शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी २००रू. बील देण्यात येत आहे. गेल्यावर्षी ऊसाचे प्रमाण कमी असूनही कारखाना सुरू केला.कामगारांना आणि कारखाना भागातील शेतकऱ्यांना न्याय देऊन चेअरमन अभिजीत पाटील यांनी २५००रू. दर जाहीर केला होता. त्याप्रमाणे २१००रू.चा पहिला हाफ्ता म्हणून वाटप केले,तर पोळासणासाठी २००रू. शेतकऱ्यांना देण्यात आले होते.उर्वरित २००रु. दिवाळीसणात देण्यात येणार आहेत,तसेच दिवाळी सणासाठी साखर वाटप केली जाईल असे डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सागितले.
शेतकऱ्यांना ऊस उत्पादन करताना अनेक अडचणी येत असतात. याअडचणी लक्षात घेऊन येत्या काळात शेतकऱ्यांनी ऊसाचे एकरी उत्पादन जास्तीत जास्त वाढावे यासाठी डिव्हिपी उद्योग समूहाच्यावतीने शेतकरी मार्गदशन, शेतकरी मेळावा, ऊस उत्पादन वाढीसाठी विविध विकास उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्याच बरोबर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर ऊस लागवड करावी. ऊस संपे पर्यंत धाराशिव कारखाना गाळप करेल प्रत्येक शेतकऱ्यांनी लागवडी बरोबर एकरी उत्पादन वाढीवर भर द्यावा, सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *