ताज्याघडामोडी

पांडुरंग तात्या माने यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त अन्न धान्य वाटप

पांडुरंग तात्या माने यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त अन्न धान्य वाटप

 

पंढरपूर प्रतिनिधी- पै. पांडुरंग तात्या माने यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त अन्न धान्य वाटप करण्यात आले. अशी माहिती पांडुरंग तात्या माने फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.

          

           पांडुरंग तात्या माने यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव निलेश माने यांनी पांडुरंग तात्या माने फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून अनेक सामाजिक कार्यक्रम या संस्थेच्या नावावर करत असतात. कोरोनाच्या काळात सुद्धा सलग शंभर दिवस त्यांनी सफाईकर्मचारी, गोरगरीब, पोलीस प्रशासन व बेरोजगार यांना अनेक वेगवेगळे पदार्थ करून अन्न दान केले आहे.

         

           या कोरोनाच्या रोगा मुळे अनेकांच्या चुली पेठल्या नाहीत. अजून सुद्धा अनेकांना काम नाही, व्यवसाय नाही, अजून सुद्धा हलाकीचे दिवस आहेत या लॉकडाउन च्या काळात उपासमारीची दिवस नागरिकांनी काढले आहेत. या गोष्टी लक्षात घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महामारीचा विचार घेत काही वेगळा कार्यक्रम न घेता गोरगरिबांना अन्न धान्याचे किट तयार करून गोरगरिबांना वाटप केले व स्व.पै. पांडुरंग तात्या माने यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली.

     यावेळी उपस्थित सुरेखाताई माने व गणेश माने, फाऊंडेशन संस्थापक निलेश माने, पंढरी संचार संपादक ऋषिकेश बडवे, दिनेश माने, सावंत सर, बाबू संगमनेरकर, शकील मुलाणी, विशाल लवंड, उमेश जाधव, तन्मय अधटराव, रामलिंग पाटील, संकेत श्रीखंडे, मुकेश लकेरी, व इतर मित्र परिवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *