ताज्याघडामोडी

बळीराजा शेतकरी संघटनेने पाडले राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद, काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने बळी राजा शेतकरी संघटना झाली आक्रमक

बळीराजा शेतकरी संघटनेने पाडले राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद.

काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने बळी राजा शेतकरी संघटना झाली आक्रमक

सध्या मोहोळ पंढरपूर आळंदी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 चे काम सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून सुरू असणाऱ्या रस्त्यात नियमाप्रमाणे वरील काळी मातीचे उत्खनन करून त्यामध्ये दर्जेदार मुरूम भरणे आवश्यक असताना सध्या सुरू असलेल्या नारायण चिंचोली देगाव हद्दीतील या ठेकेदाराकडून मनमानी कारभार करत काळया मातीचे उत्खनन न करता फक्त वरवरचे गवत जेसीबीने सारून याचा काळया या मातीवर माती वजा मुरमाची मलम पट्टी सुरू या रस्त्यासाठी लागणाऱ्या मुरमाची वाहतूक उजनी डावा कालवा वितरिका 38 वरून होत आहे मुरमाची रॉयल्टी भरलेली नाही शेततळ्याच्या नावाखाली हे उत्खनन केले जात आहे व मुरूम वाहतूक करताना अवजड ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे त्यामुळे या कॅनॉल ला धोका निर्माण झाला आहे ग्रामीण रस्ते बाद करून केली जात आहे त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून ते काम आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने बंद पाडले आहे या रस्त्याच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाऊ जमिनी कमी मोबदल्यात दिल्या आहेत कामात सुसूत्रता आल्याशिवाय आम्ही हे काम करू देणार नाही तर या कामाची गुण नियंत्रक विभाग मुंबई यांच्याकडून चौकशी करून मगच काम सुरू करावे अन्यथा पुढील दिवसात हे काम करू देणार नाही संघटने बरोबरच शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे करू असे इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माऊली हळणवर यांनी दिला आहे

यावेळी रासपचे पंकज देवकते संजय लवटे शेतकरी सज्जन सरडे तुकाराम बर्डे विक्रम तरंगे सुरज खरात ज्ञानेश्वर गुंडगे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *