ताज्याघडामोडी

भाजप प्रणित ब्राम्हण महामंडळाचे ब्राम्हण प्रेम बेगडी 

भाजप प्रणित ब्राम्हण महामंडळाचे ब्राम्हण प्रेम बेगडी 

कॉग्रेसच्या द.बडवे यांचा आरोप 

नुकतेच ब्राम्हण समाजाच्या एका शिष्ट मंडळाने माजी आमदार मेघा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ब्राम्हण समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन सादर केले आहे. परंतु महाराष्ट्रात फडणवीस यांचे सरकार असताना ब्राम्हण समाजाचे विविध प्रश्न मार्गी लागले नाहीत. त्याना ब्राम्हण समाजाचे विकास कामे केल्यामुळे सत्ता जाईल ही भिती होती त्याच्याकडे व मुनगुंटीवार यांच्याकडे आम्ही वीस निवेदने दिले त्याचे एकही उत्तर आले नाही. उलटपक्षी फडणवीस च्या काळात चंद्रकांत पाटील यांना हाताशी धरून काही ब्राम्हण मंडळीनी कोल्हापूर च्या देवस्थानातील ब्राम्हण समाजाची परिस्थिती बिघडवून त्याचे कायद्यात रूपांतर केले व विठ्ठल मंदीरात अद्याप ब्राम्हण ब्रम्हवंदाचा नैवेद्य वारकरी मंडळी प्रमाणे सोडला जात नाही. तसेच याच मंडळीनी मंदिरातील पुर्वपरंपरागत हक्क असलेल्या पुजार्‍याच्या मंदिरात पुरोहित ठेवण्याची मागणी केली. सदरचे ब्राम्हण मंडळ ब्राम्हण विरोधी करवाया करित आहे.बडवे उत्पात सेवाधरी ब्राम्हण नव्हेत का? मुंबई येथील ब्राम्हण अधिवेशनात मंदिरातील पुर्व परंपरेप्रमाणे पुजार्‍याचे हक्क पुर्नप्रदास्थापित करावेत अशी मागणी जोर धरू लागली होती, परंतु त्याचा अद्याप विचार झाला नाही. मी भुगावच्या अधिवेशना पासून निरा नसीगपूर च्या अधिवेशनापर्यंत सर्व पदाधीकार्‍याना भेटून मंदिरातील परंपरे प्रमाणे पुजारी हक्कदाराचे पुर्नजिवन व्हावे म्हणून त्याच प्रमाणे ब्राम्हण समाजाला अल्पसंख्याक दार्जा मिळावा तसेच, दारिद्र रेषे खालील पुरोहिताना मासिक मानधन मिळावे. की ज्या प्रमाणे अंध अंपग व्यक्तीना नगरपालीकेच्या उत्पनाच्या काही टक्के मिळते त्या प्रमाणे मानधन द्यावे. अशा अनेक मागण्या आम्ही शासन दरबारी केल्या आहेत त्याचे भाजप प्रणित सरकारने उत्तर दिले नाही सत्ता गेल्या नंतर भाजप प्रणित ब्राम्हण मंडळाला जाग आली आहे. त्याच प्रमाणे पंढरपूरातील ब्राम्हण नेतृत्वावर ही भाजपाच्या एका गटाने अन्याय केला आहे. कै.सुधाकरपंत परिचारक यांना देवाज्ञा झाल्यानंतर आघाडी चे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांनी त्याच्या कार्याचा गौरवाचा उल्लेख करून श्रद्धाजली वाहीली त्यानंतर भाजपाचे मा.मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही त्याचा सहकारचे डॉक्टर म्हणून उल्लेख केला परंतु सोलापूर जिल्ह्यातील ज्युनियर नेत्याला फडवीस यांनी राज्यपाल पदाचे अमिष दाखवले परंतु जेष्ठ नेते कै.सुधाकपिंत परिचारक यांच्या कार्याचा त्याना विसर पडला.भाजपची केंद्रात सत्ता आहे.की ज्या प्रमाणे कलावंत साहित्यिक पत्रकार क्रिडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तीला पद्मभुषण पद देऊन गौरव करतात त्या प्रमाणे, आयुष्यभर शेतकरी,कष्टकरी यांचे जिवन फुलवणारे सहकाराचे डॉ.स्व.सुधाकरपंत परिचारक यांना पद्मभुषण देऊन सन्मान करावा. त्याच प्रमाणे मोदी सरकारने केद्रांत त्वरीत ब्राम्हण अर्थिक महामंडळ स्थापन करावे ही विनंती.तसेच भाजपने ब्राम्हण महासंघाच्या सौ.मेघाताई कुलकर्णी यांना राज्यसभेवर घेऊन त्याचे राजकीय पुर्नवसन करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *