आशा स्वयंसेवीकांना शासनाने भरीव अर्थिक मदत करावी – दिलीप धोत्रे

पंढरपूर(प्रतिनिधी):-
कोरोनाच्या काळात समाजातील शेवटपर्यंतच्या घटकापर्यंत पोहचून प्रत्येक नागरिकांचे थर्मलस्क्रिनिंग करण्याचे काम शासनाच्या अल्प मानधनावर आशा स्वयंसेवीका करीत आहेत.त्यामुळे शासनाने त्यांना भरीव अर्थिक मदत करावी असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केले.
7 ऑगस्ट विणकर दिना निमित्त एस.बी.सी. संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत आमने यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधुन करकंब विणकर समाजाच्या वतीने दिलीप धोत्रे यांनी कोरोनाच्या काळात गोरगरिब-गरजू समाजातील नागरिकांना मोफत अन्नधान्याच्या किटचे वाटप केले होते त्यामुळे त्यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी धोत्रे बोलत होते.
तसेच यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच व सर्व कर्मचारी वर्ग, करकंब विभाग पत्रकार संघ,आशा स्वयंसेवीका,मेडिकल आसोशिएशन,आरोग्य विभाग व सफाई कर्मचारी,पोलिस उप निरीक्षक महेश मुंढे, विजय माळी,समाज सेव विजय लादे यांना कोवीड योद्धा सन्मानपत्र, मास्क व सेनिडायझर देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी SBC संघर्ष समितीचे पश्चिम महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष जयंत टकले, राजेंद्र करपे सर,अभिजीत टेके,संजय दुधाणे,हेमंत तारळकर,गणेश वास्ते,जयंत फासे,अविनाश म्हेत्रे,धोंडीराम भाजीभाकरे, विक्रम म्हेत्रे,शंकर लाटणे, किरण गुरसाळे, बाळकृष्ण टेके,चंद्रकांत रसाळ गुरूजी, विष्णू टेके,सौ राधिका ईदाते,उज्वला करपे सारीका टकले,निर्मला फासे आदीसह समाज बांधव उपस्थित होते.