Uncategorized

… आणि काका लांबोटीतूनच परत फिरले

गतवर्षी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष पदाची खांदेपालट झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला राष्ट्रवादी कॉग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला गेला,गटबाजी चव्हाट्यावर आली आणि थेट माध्यमांसमोर येऊन आरोप प्रत्यारोप होताना दिसून येऊ लागले.पंढरपूर शहर व तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये भालके सर्मथक आणि भालके विरोधक अशी फाटी आखली गेली असून विविध कार्यक्रम,पक्षाच्या आदेशानुसार करण्यात येणारी आंदोलने अथवा स्थानिक पातळीवरील विविध विषया बाबत होणाऱ्या बैठका याही वेगवेगळ्या घेतल्या जात असल्याचे प्रकार गेल्या वर्षभरात घडले.आज पंढरपूर शहरातील जिजाऊ मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता विचार विनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या बैठकीत काही ‘वेगळे’ घडवून वेगळा मेसेज वरिष्ठाना देण्याचे ‘नियोजन’ झाल्याची कुणकुण बळीराम साठे यांना पंढरपूरकडे जाताना लागली आणि ते लांबोटी पासूनच परत फिरले असल्याचे समजते.         

या बैठकीत आगामी नगर पालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने  पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे का या बाबत विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्याशी संपर्क केला असता पंढरपूरची बैठक रद्द केली आहे.सोलापुरात बैठक घेणार असल्याचे सांगितले.   

  गेल्या वर्षभरापासून पंढरपूर शहर व तालुक्यात वारंवार उफाळून येणारा राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चार दिवसापूर्वी पुन्हा चव्हाट्यावर आला असून राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रिया भोसले यांनी राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या तालुका अध्यक्षा कीर्ती मोरे यांचे पद काढून घेतल्यामुळे या वादाची शहरात जोरदार चर्चा झाली.तालुका अध्यक्ष पदावरून गतवर्षी सुरु झालेला संघर्ष आता राष्ट्रवादी युवती कॉग्रेस मध्ये देखील दिसू लागला आहे.एकूणच या साऱ्या प्रकारामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांची मात्र मोठी गोची झाली असून एकाबरोबर फिरलं तर दुसरे नाराज त्या पेक्षा चालू द्या तुमचं म्हणत निवांत राहण्याकडे अनेक कार्यकर्त्यांचा कल वाढला आहे.   

हि बैठक रद्द झाल्या बाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर शहर अध्यक्ष सुधीर भोसले यांच्याकडे विचारणा केली असता हि बैठक रद्द केल्याची माहिती वरिष्ठानी दिली त्यामुळे बैठक रद्द केली अशी प्रतिक्रिया दिली आहे.             

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *