ताज्याघडामोडी

पोलीस आल्याचे पाहताच कौठाळी बंधाऱ्यावर ट्रॅक्टर सोडून वाळू चोराने काढला पळ !

पोलीस आल्याचे पाहताच कौठाळी बंधाऱ्यावर ट्रॅक्टर सोडून वाळू चोराने काढला पळ !

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कारवाईत ट्रॅक्टर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल

महसूल प्रशासनाच्या भूमिकेकडे सरकोली ग्रामस्थांचे लक्ष !

कोरोनाच्या संक्रमण काळात राज्य शासनाने अनेक कठोर उपाययोजना करत,अगदी व्यवसाय,दुकाने बंद ठेवण्यास जनतेस भाग पाडत याच्या कठोर अंलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर सोपविलेली असतानाच याच काळात पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा मात्र जोरात सुरु असल्याचे उपविभागांतर्गत केलेल्या कारवायातून स्पष्ट झाले आहे.विशेतः कौठाळी,चोंचोली भोसे आणि सरकोली गावानजीकचा भीमा काठ हा वाळू चोरांच्या रॅम्पने गजबजून गेला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
          जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्यानंतर अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बळावर पंढरपुर पोलीस उपविभाग बंदोबस्ताचे कर्तव्य पार पाडत असतानाच महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागिरकांकडून मिळालेल्या माहितीनुसार व तक्रारीची दखल रात्री अपरात्री भीमा नदीकाठावरील वाळू चोरांवर देखील कारवाई करावी लागत आहे.याच काळात वाळू चोरांकडून अगदी पोलिसांना धक्काबुकी करण्याचे प्रकार देखील घडले असून तरीही पोलीस कर्मचारी रात्री अपरात्री जाऊन कारवाई करीत असल्याने समाधानही व्यक्त होत आहे.काल मध्यरात्री वाखरी येथे बंदोबस्तास असलेले पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार कौठाळी येथे जाऊन अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे.पोलीस आल्याचे पाहताच सदर ट्रॅक्टरचालकाने पळ काढला असला तरी या कारवाईत 2,50,000/-रू. एक स्वराज कंपणीचा 855 FE मडेलचा लाल रंगाचा ट्रक्टर (नं. MH13 BR5228) डंपींग ट्रलीसह व अर्धा ब्रास वाळुसह ताब्यात घेतला असून या प्रकरणी पो. कॉ. रवींद्र भगवान बाबर यांनी भा.द.वी कलम 379 व गौण खनिज कायदा कलम 4(1) व 4(क),(1) ब व 21 अन्वये सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.
महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष ठरले चर्चेचा विषय !
पंढरपूर पोलीस उपविभागांतर्गत असलेल्या चारही पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे.अशातच कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्याने या कायद्याची अमलबजावणी करण्याची जबाबदारी अपुऱ्या बळावर पोलीस प्रशासन करीत असतानाच त्यांना रात्री अपरात्री मिळालेल्या माहितीनुसार पर्यावरण संरक्षणासाठी देखील धाव घ्यावी लागत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या चार महिन्याच्या कालावधीत अवैध वाळू उपशावर पोलिसांनी केलेल्या कारवाया आणि महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाया यात मोठी तफावत असून ज्या गावाच्या हद्दीतून अवैध वाळू उपसा होत असल्याचे पोलीस कारवाईत स्पष्ट झाले आहे त्या गावच्या तलाठी व मंडलाधीकारी याना मात्र या अवैध वाळू उपशाची निवासी पदे असतानाही भनक देखील लागत नाही हे फार मोठे गौडबंगाल आहे.   
   पंढरपूर तालुकयातील सरकोली हे तर अवैध वाळू उपशाचा गोल्डन पॉंईंट झाला असून या बाबत पंढरी वार्ताने नुकतेच एक सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.सरकोलीचे मा. सरपंच पती व प्रतापसिह मोहिते -पाटील पतसंस्थेचे चेअरमन पांडुरंग भोसले यांनी सरकोली येथील अवैध वाळू उपशाबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील येथील अवैध वाळू उपसा थांबविण्यास महसूल प्रशासन अपयशी ठरले आहे तर पोलीस प्रशासन वारंवार कारवाई करून देखील येथील अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.दोनच दिवसापूर्वी तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी सरकोली येथे भेट दिली असल्याचे समजते मात्र येथील तलाठी व मंडलअधिकारी यांच्यावर कारवाई होणार का ? या प्रतीक्षेत पर्यावरणप्रेमी सरकोली ग्रामस्थ आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *