ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज, शेळवेच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी या परीक्षेच्या सराव श्रंखलेचे आयोजन

कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज, शेळवेच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी या परीक्षेच्या सराव श्रंखलेचे आयोजन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज शेळवे पंढरपूर, यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी MHT-CET practice test series चे आयोजन केले आहे. या टेस्ट सिरीज मध्ये  एकूण 10 परीक्षा घेतल्या जाणार असून सीईटी परीक्षेसाठी असणारा पूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट होणार आहे. पंढरपूर, पंढरपूर परिसर, सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या सराव परीक्षेचा फायदा होणार आहे. दिनांक 17 जून ते 3 जुलै पर्यंत ह्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी घरी बसून सोडवू शकणार आहे. प्रत्येक परीक्षेची लिंक विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअपला परीक्षेच्या दिवशी सकाळी आठ वाजता पोहोचवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यानंतर लगेच त्याना मिळालेले गुण पाहू शकतात, तसेच कोणते प्रश्न चुकले आहेत व त्याचे योग्य उत्तर कोणते आहे हेही विद्यार्थ्यांना दिसते. परीक्षा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या  ई-मेल आयडीवर परीक्षा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र  विद्यार्थ्यांना मिळणार आहे. दिनांक 16 जून  2020 पर्यंत नोंदवलेला विद्यार्थ्यांचा सहभाग हा लक्षणीय असून अद्याप दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्यात आला आहे. निश्चितच पुढील सराव परीक्षेमध्ये ही हा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने आमच्या महाविद्यालयाचे  शिक्षक  आणि शिक्षकेतर कर्मचारी योगदान देत आहेत.  या परीक्षा सर्व विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मयोगी परिवारातील सर्व सदस्य व हितचिंतक यांचे सहकार्य होत आहे.

          लॉकडाऊन च्या काळात  विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन एम.एच.टी.सी.इ.टी. च्या प्रॅक्टिस परीक्षा कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाने सुरू केल्यामुळे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. विद्यार्थीसुद्धा या परीक्षेमुळे समाधानी झाले असून प्रत्येक परीक्षेसाठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे विद्यार्थ्यांचा सराव होत आहे. बहुतांशी पालकांनी आणि ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी टेलिफोन द्वारे कॉलेज प्रशासनाचे, प्राचार्याचे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत व परीक्षा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

          मा. आ. प्रशांतरावजी परिचारक यांनी या परीक्षा संदर्भात प्रतिक्रीया देत असताना  सर्व विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टंसिंग पाळावे स्वतःची व घरच्यांची काळजी घ्यावी तसेच एम.एच.टी.सी.इ.टी. च्या परीक्षा चे पेपर अभ्यास करून सोडवावेत व येणाऱ्या परीक्षेत  चांगले गुणांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान विद्यार्थ्यांना केले व येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मा.आ. प्रशांतरावजी परिचारक यांनी संबोधित करत असताना कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी E-Content Development and Delivery यासंदर्भात कार्यशाळा आयोजित करावी आणि येणाऱ्या परिस्थितीला शिक्षकांना सामोरे जाण्यास मदत करावी असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील सर यांनी सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा सोडवुन  परीक्षेत येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी सराव करावा असे आव्हान केले आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षकांनी दिलेल्या योगदानाचा मला अभिमान वाटतो असेही ते म्हणाले. मा प्रशांत  मालकांनी केलेल्या सूचनेचे ला अनुसरून नजीकच्या काळात लवकरच सर्व शिक्षकसाठी  E-Content Delivery and Development हे वर्कशॉप आयोजित करणार आहोत असे सांगितले. महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांनी प्रवेश विभाग प्रमुख प्रा. देशमाने यांचे अभिनंदन व तसेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले आहे व भविष्याच्या काळात निश्चितच आपण सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन वेगवेगळ्या उपक्रमाच्या साह्याने समाजपरिवर्तनाचे काम करू असे विचार प्रगट केले. उप-प्राचार्य मुडेगावकर जगदीश, सिव्हिल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. बाबर अनिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रा. धनंजय शिवपुजे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. सारंग कुलकर्णी, प्रथम वर्ष विभागाचे प्रा. नागेश तिवारी, मेकॅनिकल विभागाचे प्रा. राहुल पांचाळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड डेटा प्रोसेसिंग विभागाचे प्रा. दीपक भोसले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *