ताज्याघडामोडी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी

तालुका पोलिसांच्या कारवाईत ट्रॅक्टरसह तीन वाहने ताब्यात 
सरकोलीचे तलाठी व मंडल अधिकारी यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली हे अवैध वाळू उपशामुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले असून आठच दिवसापूर्वी या ठिकाणी झालेल्या पोलीस कारवाईत टिपर व वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या यारीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.अशातच आ. भारत भालके यांनी दोनच दिवसापूर्वी बोलताना सरकोली येथून अवैध वाळू उपसा होत असून आपण या बाबत कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी बोललो असल्याचे सांगितले होते.तर सरकोलीचे मा.सरपंच  पांडुरंग भोसले यांनी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशाबाबत अनेकवेळा तक्रार केली होती.
    आज झालेल्या कारवाईत 1) सचिन शंकर जाधव वय-35 वर्षे रा. पुळुज ता. पंढरपुर 2) श्रीकृष्ण बाबासो कोळी वय-23 वर्षे रा. शंकरगांव ता. पंढरपुर 3) कामाजी लिंगदेव वाघमोडे रा. पुळुज ता. पंढरपुर यांनी व वरील तीन ही ट्रक्टरचे मालक यांनी आपसात संगणमत करून ट्रक्टर व डंपीग ट्रेलर मधुन मौजे सरकोली येथील बंधा-याजवळ भिमानदीचे पात्रातुन संध्या कोरोना विषाणुचे संक्रमण सुरु असताना लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मनाई आदेशाचे उल्लघन करुन, जिल्हाधिकारी सोलापुर यांचे संचार बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले व पर्यावणाचा -हास होईल हे माहित असताना स्वताचे आर्थिक फायद्यासाठी शासनाचे परवानगी शिवाय अवैध रित्या वाळु उपसा करुन शासनाची गौण खनिज्याची चोरी करीत असताना मिळुन आला तसेच कर्तव्य बजावत असताना सरकारी कामात अडथळा केला आहे आणि शिवीगाळ करुन तुम्ही ट्रक्टर कसा घेवुन जाता ते बघुन घेतो अशी धमकी देवुन ट्रक्टरची चावी काढुन घेवुन नदीपात्रालगत असलेल्या ऊसात पळुन गेला. म्हणुन त्यांच्या विरुद्ध भा.द.वि. 353,379,186,188,189,34 पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9,15 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम- 51 (B) प्रमाणे गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *