गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चिंचोली भोसे परिसरातून डम्पिंग ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा

चिंचोली भोसे परिसरातून डम्पिंग ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा

पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई 

प्रकरण दंडात्मक कारवाईसाठी महसूलकडे वर्ग होणार ?

पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार उघडकीस येत असून तीनच दिवसापूर्वी शेगाव दुमाला येथून अवैध वाळू उपसा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता व याबाबत पिकअप चालकावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.मात्र त्याच वेळी इसबावी नजीकचा नदीकाठ परिसर,पंढरपूर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राचे भीमा नदीतील जॅकवेलचा परिसर,नवीन पूल ते कौठाळी हद्दीपर्यंत अहोरात्र वाळू उपसा होत असल्याची चर्चा सातत्याने या भागातील नागिरकांमधून होताना दिसून येते.दिवसभर होडीद्वारे रिकाम्या सिमेंट गोण्यात वाळू भरून त्याची वाहनाद्वारे विक्री केली जात असल्याचेही अनेकवेळा निदर्शनास आले आहे.आता तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत हि बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे. 
       रविवार दिनांक १५ मार्च रोजी चिंचोली भोसे परिसरातुन अवैध वाळू उपसा होत असल्याची खबर मिळ्याल्यानंतर सदर प्रकरणातील फिर्यादी अशोक दगडु भोसले पो. हे. कॉ.शिंदे ,पो.ना मोरे हे खाजगी मोटार सायकलने मौजे चिंचोली भोसे येथील स्मशानभुमीपासुन मुरलीधर नामदेव कांबळे यांचे शेताचे दिशेने नदी पात्रातुन जात असताना भिमानदीपात्रामध्ये दोन इसम एका ट्रँक्टर व डंपिग टेलर मध्ये भिमा नदीपात्रातील वाळु भरताना दिसले, पोलीस कर्मचारी येत असल्याचे पाहताच सदर ट्रँक्टर चालकाने ट्रँक्टर चालु करुन पाठीमागील डंपिग टेलर मधील वाळु भिमानदीपात्रातच खाली करुन ट्रँक्टर व डंपिग टेलर खाली करुन ट्रँक्टर व डंपिग टेलर पळवुन घेवु जाउ लागला तसेच दुसरा इसम नदीकडेच्या झाडाझुडपातुन पळुन गेला तेव्हा पोलिसांनी ट्रँक्टर व डंपिग टेलर चा पाठलाग करुन सदर ट्रँक्टरचे चालकास ट्रँक्टर थांबन्यास भाग पाडले .सदर ट्रँक्टरचे चौकशी करता त्यांने आपले नांव माऊली त्रिबंक वायदंडे वय-20 वर्षे रा. देगाव ता. पंढरपुर असे असल्याचे सांगुन सदर ट्रँक्टर हा पळुन गेलेला दुसरा इसम अनिल लक्ष्मण पवार रा.चिंचोली भोसे ता. पंढरपुर याचे मालकीचे आहे असे सांगितले. सदर ट्रँक्टर चालकाकडे वाळु उत्खननाचे पास परवान्याबाबत विचारले असता त्याने पास परवाना नसलेचे सांगितले. सदर ट्रँक्टर व डंपिग टेलरमध्ये भिमानदीपात्रातुन उत्खनन करुन भिमा नदीपात्रात खाली केलेल्या वाळुचे वर्णन खालीलप्रमाणे 1) 2,04,000/-रु त्यात एक निळे पांढरे रंगाचा नंबर खाडाखोड केलेला न्यु हंलड 3630 कंपनीचा ट्रँक्टर त्याचा चेसी नं. 2258803 व इंजिन नं. 1217480तसेच सदर ट्रँक्टरला जोडलेली एक बिगर नंबरची लाल पांढरे रंगाची डंपिग ट्रली ट्रॅक्टसह ताब्यात घेतली आहे.
पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईतील वाहनांवर महसूल अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी शेगाव दुमाला येथून वाळू उपसा करणारी पिकअप व चोंचोली भोसे येथे कारवाईत ताब्यात घेण्यात आलेला डम्पिंग ट्रॅक्टरवर महसूल प्रशासन दंडात्मक कारवाई करणार का ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *