ताज्याघडामोडी

‘त्या’ संशयित चोरट्या महिलेचा शोध पंढरपूर तालुका पोलिसांना लागेना !

‘त्या’ संशयित चोरट्या महिलेचा शोध पंढरपूर तालुका पोलिसांना लागेना !

महिलांसाठी लग्न सराईत दागिन्यांसह एस.टी.प्रवास झाला धोक्याचा 

पंढरपूर -मंगळवेढा तालुक्याचे आमदार भारत भालके यांचे स्वीय सहाय्यक असलेले विजय मोरे यांच्या पत्नीचे दागिने पंढरपूर-सांगोला प्रवासादरम्यान शेजारी बसलेल्या महिलेने जवपास १० तोळे वजनाचे दागिने नजर चुकवून चोरून नेले,सदर संशयित चोरटी महिला हि लहान बाळास मांडीवर घेऊन एस.टी.बस मध्ये शेजारी बसली होती.पंढरपूर शहरातील लहुजी वस्ताद चौक (सांगोला चौक) येथे या महिलेसह आणखी एक महिला एस.प्रवासासाठी एस.टी.बस मध्ये चढली होती.सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीनजीक सदर दोन्ही महिला एसटीतुन उतरल्या.मात्र यानंतर सदर चोरीची घटना उघड झाली होती.   

     सदर प्रकरणातील फिर्यादी महिला आणि तिचा पोलीस खात्यात असलेला भाऊ यांनी या बाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.मात्र हा गुन्हा पुढे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.यानंतर सदर चोरीच्या घटनेतील संशियत चोरटी महिला हि पंढरपूरातून एस.टी.बस प्रवास करीत असल्याने पंढरपुर तालूका पोलीस ठाण्याकडून याचा तपास वेगाने हॊईल अशी अपेक्षा होती. मात्र घटना घडून अनेक दिवसाच कालावधी लोटला तरी या चोरीच्या तपासात कुठलीही प्रगती झाली नसल्याचे दिसून येते. त्या मुळे सदर संशियत चोरटी महिला हि अजूनही मोकाट असून सदर महिलेचे इत्यंभूत वर्णन देऊनही तपास लागत नाही.  त्यामुळे लग्न सराईच्या काळात प्रवास करणाऱ्या महिलांना आपल्या सोबत असलेल्या दागिन्यांची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.विद्यमान आमदाराच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीच्या दागिन्यांची चोरी होऊनही जर तपास लागत नसेल तर सामान्य जनतेचे काय अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली असून लग्न समारंभास जाताना महिलांनी विना दागिने जाणेच जास्त सोयीचे ठरेल अशीही प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *