ताज्याघडामोडी

गॅस दाहिनीमुळे पर्यावरण रक्षण आणि लोकांची गैरसोय दूर होणार- सभापती विक्रम शिरसट

गॅस दाहिनीमुळे पर्यावरण रक्षण आणि लोकांची गैरसोय दूर होणार- सभापती विक्रम शिरसट

नाममात्र ५०० रुपये शुल्क आकारणार 

पंढरपूर नगर पालिकेने खा.राजकुमार धूत यांच्या खासदार निधीतून पंढरपुरातील वैकुंठ स्मशान भूमीत  गॅस दाहिनीची उभारणी केली असून या गँस दाहिनीमुळे वृक्षतोडीस आळा बसून पर्यावरणाचे रक्षण होणार आहे त्याच बरोबर केवळ ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याने सरपण गोवऱ्या खरेदीसाठी करावा लागणारा मोठा खर्चही वाचणार आहे. लवकर हि गॅस दाहिनी सुरु होणार असल्याची माहिती पंढरपूर नगर परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट यांनी दिली आहे.  

        पंढरपूर शहरातील वैकुंठ स्मशान भूमीत पंढरपूर नगर पालिकेने वृक्षारोपण, पेव्हर ब्लॉक टाकणे,निवारा शेड उभा करणे आदी कामे पूर्ण झालेली आहेत.मात्र या ठिकाणी विद्युत अथवा गँस दाहिनी बसविण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. अनेक शहरात सध्या अशाच प्रकारच्या दाहिन्याचा वापर केला जातो हे लक्षात घेऊन विद्युत दाहिनी बसविण्यात येत आहे.या दाहिनीसाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आला असून ठाणे येथील चिरंतन उद्योगाच्या माध्यमातून हे काम करण्यात आले आहे.१ वर्ष कालावधीसाठी या दाहिनीचे व्यवस्थापन मक्तेदार मक्तेदाराकडे देण्यात आले आहे.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *