Uncategorized

तान्हुल्याला घेऊन शेजारी बसली आणि सहप्रवासी महिलेचे बॅगमधून दहा तोळ्याचे दागिने केले लंपास 

तान्हुल्याला घेऊन शेजारी बसली आणि सहप्रवासी महिलेचे बॅगमधून दहा तोळ्याचे दागिने केले लंपास 

पंढरपूर-सांगोला एस.टी. प्रवासातील घटना

अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल 

भावाच्या मुलाच्या लग्नासाठी सांगलीस जाणाऱ्या एसटीप्रवासात  तान्हुल्याला घेऊन प्रवास करीत असलेल्या महिलेने सहप्रवाशी महिलेच्या बॅगेतील सुमारे दहा तोळे वजनाचे दागिने अलगद लंपास केले आहेत. सदर प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात महिले विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून सदर संशियत महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.   फिर्यादी महिला हि एका साखर कारखान्यातील कामगाराची पत्नी असून लग्नकार्य असल्याने 27/01/2020 रोजी दुपारी 1:20 वा.सुमारास सोलापूर कोल्हापूर एस.टी.बसने सांगली येथे भावाकडे जाण्याकरीता म्हणून पंढरपूर एस.टी.स्टण्ड येथून त्या प्रवासास निघाल्या होत्या.लग्ना करीता म्हणून सोन्याचे गंठण,हातातील पाटल्या व कानातील ठुशी असे माझे जवळी बगमध्ये एका लहान पकेट मध्ये ठेवून सदरचे पकेट करीबग मध्ये गुंडाळून पिशवीचे तळाषी ठेवून त्यावर  सर्व कपडे ठेवले होते. सदरची बग ही एस.टी.मध्ये बसलेवर माझे सीटजवळ खाली पायास चिकटून ठेवली होती एस.टी.बसला खुप गर्दी होती.एस.टी.सांगोला चौकामध्ये आलेनंतर त्यामध्ये आणखी प्रवासी चडले होते. त्यामध्ये साधारण एक 20 ते 25 वयोगटातील स्त्री,अंगाने मध्यम व रंगाने काळी सावळी,अंगावर दुधीरंगाची साडी नेसलेली व हाता एक साधारण 8 ते 9 महिन्यांचे बाळ घेवून चढलेली होती. एस.टी.ला खुप गर्दी असल्याने व तिचे हाता लहान बाळ असल्याने ती एस.टी.बस मधील मोकळया जागेमध्ये फिर्यादीच्या पायाजवळील पिशवीस चिकटून खाली बसली होती. सदर महिलेजवळ लहान बाळ असल्याने फिर्यादीस संशय आला नाही.एस.टी.बस दुपारी 1:40 वा.सुमारास खर्डी,ता.पंढरपूर येथे आले नंतर तेथे बस मधील काही प्रवाशी उतरले होते. समोरील सीट वरील प्रवाषी उतरल्याने पिशवीजवळ बसलेली महिला तिचे लहान बाळाला घेवून समोरील सीटवर जावून बसली. त्यानंतर दुपारी 2:00 वा. एस.टी.बस सांगोला येथील पंचायत समिती स्टपवर थांबलेवर सदरची महिला व इतर काही प्रवासी असे एस.टी.बस मधून खाली उतरले होते.त्यानंतर साधारण 5 मिनीटांनी एस.टी.बस सांगोला एस.टी. स्टण्ड येथे आलेवर फिर्यादी महिलेने पाणी पिण्याकरीता म्हणून खाली ठेवलेली बग मांडीवर घेतली असता तिची चैन उचकटलेली दिसली.  बगेमधील कपडे उचकटल्या सारखे व चुरगाळलेले दिसले म्हणून   तळाला हात घालून पाहिले असता तळाला ठेवलेली सोन्याचे दागिने असलेली करीबग हाताला लागली नाही. सदर अज्ञात महिला हि सांगोला येथील पंचायत समिती स्टपवर उतरुन निघून गेली आहे.   या बाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.चोरीस गेले सोन्याचे दागिन्यांचे वर्णन खालील प्रमाणे.1) 1,22,50000एक 4 तोळे 9 ग्रम वजानाचे सोन्याचे पट्टीचे व खालील बाजूस सोनयाचे पदक व त्यास  लहान साखळया असलेले गंठण जु.वा.किं.अं.2) 1,00,000004 तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन पाटल्या जु.वा.किं.अं.3)  10,000004 ग्रम वजनाच्या दोन्ही कानातील सोन्याच्या ठुशी  असे दागिने चोरीस गेले आहेत.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *