ताज्याघडामोडी

शेतीतील वाटेकऱ्याने लंपास केली जावयाची गाई आणि पिव्हीसी पाईप 

शेतीतील वाटेकऱ्याने लंपास केली जावयाची गाई आणि पिव्हीसी पाईप 

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासऱ्याची केला गुन्हा दाखल 

पुणे येथे रहात असलेल्या व पंढरपुर तालुक्यातील शिरढोण येथे शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याने आपली जमीन ज्याला वाट्याने दिली होती त्या वाटेकऱ्याने विश्वासघात करीत एक गीर जातीची गाई व  पिव्हीसी पाईप असे ६५ हजार किमतीचा ऐवज परस्पर लंपास करीत व उत्पन्नाचा हिशोब न देताच वाटेकरी सुधाकर विठ्ठल मोटकर व रामा रोहिदास मोटकर हे गायब झाल्याची तक्रार  फिर्याद मदनराव गायकवाड (ह.मु. पुणे) यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
   फिर्यादी  मदनराव गायकवाड  यांचे जावई कृष्णात देशमुख यांची शेती मौजे शिरढोण ता.पंढरपूर येथे असुन त्याचा गट नं.95/1,95/2क,96/1,95/2अ असे एकुण 22 एकर शेती आहे. सदर शेती वाट्याने सुधाकर विठ्ठल मोटकर व रामा रोहिदास मोटकर दोघे रा. मुंगी ता.शेवगांव जि.अहमदनगर यांना करणेसाठी जुलै 2016सालापासुन दिली होती . शेतीसाठी लागणारे औषधे ,खते व इतर खर्च फिर्यादीचे जावई स्वतः करीत असत. उत्पन्नापैकी 60 टक्के रक्कम वाटेकऱ्यास दिली जात असे तर 40 टक्के रक्कम फिर्यादीचे जावई कृष्णात देशमुख
यांना मिळत असे.सदर फिर्यादी व त्यांचे जावई हे २८ जानेवारी रोजी शिरढोण येथील शेतात आले असता सदर वाटेकरी व फिर्यादीत नमूद केलेला मुद्देमाल गायब असल्याचे दिसून आले आहे. 
    या बाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 
भारतीय दंड संहिता १८६०
३७९

 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *