ताज्याघडामोडी

छावा क्रांतिवीर सेनेचा वर्धापनदिन दिनानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन 

छावा क्रांतिवीर सेनेचा वर्धापनदिन दिनानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन 

खा. छत्रपती संभाजी राजे यांनी केली छावा क्रांतिवीर सेनेच्या कार्याची प्रशंसा

छावा क्रांतिवीर संघटेनच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त व संघटनेचे संस्थापक करणं गायकर यांच्या वाढदिवसा निमित्त छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.युवराज छत्रपती संभाजी राजे हे होते. यावेळी संघटनेचे शेतकरी आघाडी पश्चिम  अध्यक्ष धनराज लटके यांच्यासह संख्येने विविध प्रदेश कार्यकारणी सदस्य, जिल्हा अध्यक्ष,ग्रामस्थ,मित्रपरिवार,स्नेही आदी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा उमेश शिंदे यांनी केले .करण गायकर व संघटना गेले अनेक वर्षांपासून करत असलेल्या व भावी वाटचाली ,केलेले कामे ,भविष्यातील झपाट्याने करावयाची कामे याबाबतीत उहापोह प्रास्ताविकात केला.उपस्थित सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सरपंच सदस्य यांचा सत्कार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करून त्यांना गौरवण्यात आले.संस्थापक करण गायकर यांच्या मूळ गावी संघटनेचा एखादा कार्यक्रम व्हावा अशी त्यांची सर्व ग्रामस्थांचे इच्छा असल्याकारणाने हा सोहळा घेण्यात आला होता सोहळा हा ग्रामीण भागात असल्या कारणाने तरीदेखील संघटनेवर प्रेम करणारे गायकर परिवारावर प्रेम करणारे राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी उद्योग अधिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
महाराष्ट्रात सर्वदूर पोहचवण्यासाठी ही करणं गायकर यांच्या अथक प्रयत्नाचे यश होते असे त्यांनी आवर्जून सांगितले.जे ठरवलं ते करून दाखवण्यात करण गायकर यांचा हातखंडा असल्याचे सांगत धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांनी अनेक प्रसंग यावेळी करण गायकर व छावा क्रांतीवीर सेनेच्या कामाविषयी बोलून दाखवले. 

    अध्यक्षीय भाषणामध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी  १० वर्षांपूर्वीचा करण गायकर आणि आत्ताच करण गायकर या दोघांमधील फरक उपस्थितांना आपल्या शब्दांमध्ये ऐकविला . खाणीत पैलूंना पडलेल्या हिऱ्या प्रमाणे करण गायकर पूर्वी होते परंतु आता गेली दहा वर्षांमध्ये करण गायकर या व्यक्तीला या हिऱ्याला अनेक चांगले पैलू पाडून सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर केलेले आहेत असे सांगितले.
    यावेळी आ.अपूर्व हिरे,स्थायी समितीसभापती उद्धव बाबा निमसे ,आ.किशोर दराडे ,चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग मोरे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जगताप चित्रपट आघाडी जिल्हा अध्यक्ष तात्या डुबल,तालुका संघटक घोडके सर पंढरपूर शहराध्यक्ष राहुल डोंगरे शहर संपर्क प्रमुख परमेश्वर डांगे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश क्ष्रीसागर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य गणपत जगताप यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा उमेश शिंदे व सुनील भोर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *