ताज्याघडामोडी

स्वेरीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तीन विद्यार्थिनींची ‘वर्ले’ या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड वार्षिक रु. ५.१५ लाखांचे पॅकेज

पंढरपूरः वर्ले’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या  मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील आकांक्षा शेळकेआकांक्षा जाधव व अस्मिता सरवदे या तीन विद्यार्थिनींची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

      ‘वर्ले‘ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील आकांक्षा बिभीषण शेळकेआकांक्षा सौदागर जाधव व अस्मिता धनाजी सरवदे या तीन विद्यार्थिनींची निवड केली असून त्यांना प्रत्येकी वार्षिक रु. ५.१५ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. ‘वर्ले’ ही कंपनी ४५ देशांमध्ये कार्यरत असून जवळपास पन्नास हजार कर्मचारी प्रोजेक्ट डिलिव्हरीकन्सल्टींग सर्विसेसएनर्जी सेक्टर आणि प्रोसेस इंडस्ट्री या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. या कंपनीचे मुख्य कार्यालय ऑस्ट्रेलिया मध्ये आहे तर भारत देशातील मुख्य कार्यालय हे मुंबई येथे आहे. या कंपनीच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थिनींना बाहेरच्या देशांमध्ये देखील काम करण्याची संधी मिळू शकते. इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून मागील दोन वर्षांपासून विद्यार्थिनींची भरपूर मागणी वाढली आहे. ऑटोमेशनरोबोटिक्स आणि सेंन्सर टेक्नॉलॉजीमुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपनीचे वर्क कल्चर हे पूर्णपणे बदलून गेले आहे. त्यामुळे या क्षेत्रात मुलींना नोकरीच्या सर्वात जास्त संधी निर्माण होत आहेत. या व्यतिरिक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यापीएसयु मधून संधी तसेच मर्चंट नेव्ही सारख्या वेगळ्या प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंटसाठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मधील व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवारअभियांत्रिकी पदवीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवारस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून वर्ली’ या कंपनीत निवड झालेल्या आकांक्षा शेळकेआकांक्षा जाधव व अस्मिता सरवदे यांचे अभिनंदन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *