ताज्याघडामोडी

आज 1 जानेवारीपासून यूपीआयचे नियम बदलणार, जाणून घेऊयात नवीन नियम

1 जानेवारीपासून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) काही युनिफाइड इंटरफेस पेमेंट म्हणजे यूपीआय नियम ( UPI ) बदलण्यात येणार आहेत.भारतात यूपीआयचे युजर्स 40 कोटींच्या घरात असून, यूपीआयद्वारे 2023 या वर्षात 16 लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत.यामध्ये भीम, गुगलपे, फोनपे, पेटीएम, ॲमेझॉन पे यांसारख्या ‘यूपीआय’ ॲपचा लोक वापर करतात.

1 जानेवारी 2024 पासून यूपीआयचे नियम बदलणार असून नवीन नियम जाणून काय असणार ते जाणून घेऊया –

 

जर एखाद्या यूपीआय आयडीवरून तुम्ही एका वर्षात एकदाही ऑनलाईन पेमेंट केलं नाही तर तुमचा आयडी 1 जानेवारी 2024 पासून ब्लॉक करण्यात येणार आहे.

स्मार्टफोनमधील ‘एनएफसी’ (निअर फिल्ड कम्युनिकेशन) क्षमतेचा वापर करून ‘क्यूआर कोड’ स्कॅन न करता एकावेळी 500 रुपयांपर्यंत परंतु, दिवसभरात चार हजार रुपयांइतके पेमेंट ‘यूपीआय’द्वारे करता येईल.

या वर्षभरात ‘यूपीआय’चा वापर करून सुमारे 30 हजार कोटी रुपयांच्या रकमेचे गैरव्यवहार झाले आहेत. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे असे गैरव्यवहार टाळण्याच्या उद्देशाने काही बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिल्यांदा एखाद्यास दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम देणार असू, तर ती रक्कम हस्तांतर होण्यासाठी चार तासांचा कालावधी लागेल. त्यापुढील व्यवहार लगेचच पूर्ण होतील. या बदलाबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

3.एका दिवसात जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत पेमेंट करता येईल. मात्र, हॉस्पिटल किंवा एखाद्या शैक्षिणिक संस्थेस जास्तीतजास्त पाच लाख रुपये इतके पेमेंट एका दिवसात करता येईल.

4.बँक खाते ज्याच्या नावाने असेल तेच नाव मोबाईल स्क्रीनवर दिसेल. यामुळे आपले वापरात नसलेले सीम कार्ड मोबाईल कंपनीने दुसऱ्या कोणास दिले, तरी त्याचा गैरवापर होणार नाही.

5.’एटीएम’वर क्यूआर कोड स्कॅन करून रोख रक्कम काढता येईल.

6.बँक खातेदाराचे आर्थिक व्यवहार व सिबिल स्कोअर विचारात घेऊन खातेदारास क्रेडिट लाईन देता येऊ शकेल. याचा वापर क्रेडिट कार्डसारखा करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *