जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यात अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच आरोपीने पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित बालिकेची तब्येत खालावली आहे. तिला उपचारासाठी अकोला येथील वैद्यकीय उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चॉकलेटचे आमिष देऊन १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाने बालिकेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
आरोपीने बालिकेवर अत्याचार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर बालिका बेशुद्ध झाली. मात्र तिला मृत समजून आरोपीने पलायन केले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पडक्या घराजवळून एक व्यक्ती जात असताना घरातून आवाज आला. त्याने घराची कडी उघडून पाहिल्यानंतर पीडित बालिका दिसून आली. त्यावेळी तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बोरखेडी ठाणेदार बळीराम गिते पथकासह गावात दाखल झाले.
आरोपीची माहिती घेत या अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले. याप्रकरणी बोराखेडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बालिकेची तब्येत गंभीर आहे. या बालिकेला अकोला येथील रुग्णाल्यात भरती करण्यात आले आहे. महिला सुरक्षित राहाव्या यासाठी अनेक कायदे आणि त्यामध्ये वारंवार कठोरता आणली गेली आहे. पण तरी देखील असे संतापजनक कृत्य समोर येत आहे. त्यामुळे या कायद्यांना कमी वेळामध्ये कठोर शासनापर्यंत संबंधित गुन्हेगारांना पोहोचवल्या जाईल यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.